Advertisement

'दबंग ३'मध्ये झळकणार महेश मांजरेकरांची कन्या अश्वमी?


'दबंग ३'मध्ये झळकणार महेश मांजरेकरांची कन्या अश्वमी?
SHARES

सलमान खान जसा अभिनय, आॅनस्क्रिन जलवा आणि समाजकार्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो मैत्रीसाठीही आहे. सिनेसृष्टीतील त्याच्या मित्रांची संख्या मोजदाद करण्याच्या पलिकडे आहे. यात मराठमोळे दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते महेश मांजरेकर यांचाही समावेश आहे.

केवळ सलमाननं आग्रह केल्यामुळे मांजरेकरांनी त्याच्या बऱ्याच सिनेमात अभिनय केल्याचं त्यांनी स्वत: खासगीत बोलताना सांगितलं आहे. 'दबंग' हा देखील त्यापैकीच एक आहे. या सिनेमात त्यांनी 'रज्जो' म्हणजेच सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता मांजरेकरांची मुलगी अश्वमी सलमानच्या दबंग ३ मध्ये झळकणार आहे.

सलमानने आजवर बऱ्याच नवोदितांना सिनेसृष्टीत ब्रेक दिला आहे. या कलाकारांच्या यादीत आता अश्वमीचंही नाव सामील झालं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 'दबंग ३'साठी अश्वमीची निवड करण्यात आली आहे. 'दबंग ३' हा 'दबंग' सिरीजमधील प्रिक्वल असणार, हे एव्हाना सर्वांनाच ठाऊक झालं असेल. या सिरीजमध्ये सलमानने साकारलेल्या चुलबूल पांडे या व्यक्तिरेखेची कथा 'दबंग ३'मध्ये पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात सोनाक्षीखेरीज आणखी एका अभिनेत्रीची निवड केली जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अश्वमीच्या रूपात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याचं समजतं. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.


हेही वाचा -

कोण बनणार ‘भाई’?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा