अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?

मराठमोळ्या अमृता खानविलकरनं आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर हिंदी सिनेसृष्टीचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आता 'मलंग' या आगामी सिनेमात तिचा काहीसा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे.

  • अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?
  • अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?
  • अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?
SHARE

मराठमोळ्या अमृता खानविलकरनं आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर हिंदी सिनेसृष्टीचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आता 'मलंग' या आगामी सिनेमात तिचा काहीसा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे.

अमृतानं आलिया भट्टच्या 'राझी' या सिनेमासोबतच जॅान अब्राहमच्या 'सत्यमेव जयते'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांचं सर्वांनीच कौतुक केलं. अभिनयासोबतच नृत्यातही पारंगत असलेल्या अमृतानं हिंदी सिनेसृष्टीवर जणू जादूच केली आहे. त्यामुळंच तिला एका पेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं, तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलीवूडमध्ये देखील होत असते. अमृतानं साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आता यामध्ये आणखी भर पडणार आहे. अमृताचा 'मलंग' हा नवीन सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.


मोहित सुरी दिग्दर्शित 'मलंग' या सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, अमृताची 'मलंग' झलक पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक झाले असतील. मराठीसह हिंदी सिनेमांतही अमृतानं झोकून देऊन काम केलं आहे. प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीनं पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही, तर हिंदी टेलिव्हिजन, वेब सिरीजमध्येही उत्तम अभिनय केला आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिली आहे. आता पुन्हा एकदा त्याची प्रचिती यायला हरकत नाही.
हेही वाचा -

सोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का?

'हा' सिनेमा पाहून हिरानींना आठवले जुने दिवस
संबंधित विषय
ताज्या बातम्या