Advertisement

मेहंदी चित्रपटातील अभिनेता फराज खान आयसीयूत, पूजा भट्टनं मागितली आर्थिक मदत

'मेहंदी' आणि 'फरेब' या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता फराज खान यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मेहंदी चित्रपटातील अभिनेता फराज खान आयसीयूत, पूजा भट्टनं मागितली आर्थिक मदत
SHARES

'मेहंदी' आणि 'फरेब' या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता फराज खान यांची प्रकृती चिंताजनक आहे. बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. फराजच्या उपचारांसाठी त्याच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अभिनेत्री पूजा भट्टनं ट्विटरवर ही माहिती शेअर करताना लिहिलं की, “कृपया शेअर करा आणि शक्य असेल तर योगदान द्या.”

फराजचे नातेवाईक फहाद अबाउशर आणि अहमद शमून यांनी फंड-राइजर वेबसाइटद्वारे लोकांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलं - माझा प्रिय भाऊ, मित्र आणि प्रिय कलाकार आज जीवन-मृत्यूशी संघर्ष करतोय. त्यानं आपली बरीच वर्षे कलाविश्वाला दिली आहेत आणि कॅमेरासमोर सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज त्याला जगण्यासाठी मदतीची गरज आहे. कृपया फराजच्या उपचारांसाठी शक्य तितकी मदत करा.

ट्विटरवर लिहलं आहे की, फराजला मागील एक वर्षापासून खोकला आणि छातीत संसर्ग झाला होता. अलीकडे, जेव्हा त्याचा खोकला अचानक वाढला तेव्हा त्यानं व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेतला. ८ ऑक्टोबर रोजी जेव्हा डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहिली तेव्हा त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यानंतर आम्ही रुग्णवाहिका बोलविली.

तथापि, नंतर जे घडले ते आम्हाला हादरवून टाकणारे होते. रुग्णवाहिका वाटेत असताना फराजला झटका आला आणि तो अचानक अनियंत्रित होऊन हलू लागला. जेव्हा रूग्णवाहिका घरी पोहोचली आणि त्याला स्ट्रेचरवर ठेवण्यात आले, तेव्हा पुन्हा त्याला झटका आला. यानंतर विक्रम हॉस्पिटलकडे जाताना वाटेत त्याला तिसरा झटका आला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला कळले की छातीमधील इन्फेक्शन त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचले आहे आणि त्यामुळे त्याला एकामागून एक झटके आले.

डॉक्टरांनी फराजला काही दिवस क्रिटिकल यूनिटमध्ये ठेवण्यास सांगितलं आहे. ज्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च येईल. फराज यांनी बर्‍याच वर्षांपासून चित्रपटात काम केलं नाही. त्याच्यासाठी २५ लाख रुपये ही मोठी रक्कम आहे.

फराज खान हा चरित्र अभिनेते युसुफ खान ('अमर अकबर अँथनी' फेम जेबिसको) यांचा मुलगा आहे. राणी मुखर्जी स्टारर 'मेहंदी' (1998) मध्ये फराजने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने 'फरेब' (1996), 'पृथ्वी' (1997) आणि 'दिल ने फिर याद किया' (2001) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरनं ग्रासलं, अजिंक्य देवनं दिली माहिती

सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा