Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरनं ग्रासलं, अजिंक्य देवनं दिली माहिती

सीमा यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरनं ग्रासलं, अजिंक्य देवनं दिली माहिती
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती खालावली आहे. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास आहे. सीमा यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

अजिंक्य देव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘माझी आई सीमा देव अल्झायमर या आजाराशी लढा देत आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने जे तिच्यावर भरभरून प्रेम केलं त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.

अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुवासिनी, आनंद, वरदक्षिणा, कोशिश, बदला, अपराध, सर्जा अशा नावाजलेल्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा उमटवला. त्यांना दोन मुले आहेत. थोरला मुलगा अभिनय देव हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर दुसरा मुलगा अजिंक्य देव चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत.

अल्झामयर म्हणजे काय?

अल्झायमर आजारात विसरभोळेपणा वाढत जातो. सुरुवातीला नाव विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. ६५ वर्षे वयानंतर २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे.



हेही वाचा

सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

अक्षय कुमारचा सुर्यंवंशी २०२१ मध्ये आणि रणवीरचा ८३ ख्रिसमसमध्ये होणार प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा