Advertisement

पूनम पांडेची शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात तक्रार

पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्यानंतर तिनं हायकोर्टाकडे (Bombay High Court) कूच केली आहे.

पूनम पांडेची शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात तक्रार
SHARES

मॉडल (Model) आणि अभिनेत्री (Actress) पूनम पांडे (Poonam Pandey) हिनं शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिजनेसमन राज कुंद्रा  (Raj Kundra) आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध क्रिमिनल केस केली आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्यानंतर तिनं हायकोर्टाकडे (Bombay High Court) कूच केली आहे.


काय आहे प्रकरण?

२०१९ मधला हा वाद आहे. पूनम पांडेनं आर्म्सप्राइम (Arms Prime Media) मीडिया नावाच्या एका फर्मसोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. २०१९ मध्ये आर्म्सप्राइममध्ये राज कुंद्रा हा गुंतवणुकदार होता. आर्म्सप्राइम ही कंपनी सेलिब्रिटिंच्या प्रमोशनसाठी अॅप बनवण्याचं काम करते. पूनमनं देखील आपल्या नावानं एक अ‍ॅप मिळवण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. ज्यासाठी तिला रिव्हेन्यूमध्ये योग्य भाग मिळणार होता.

पूनमनुसार, फर्ममधून तिला तिचा योग्य हिसा दिला जात नव्हता. शेयरबद्दल भेदभाव होत होता. त्यामुळे तिनं कॉन्ट्रॅक्ट परत घेतला. पण यानंतर लगेच अनेक प्रायव्हेट नंबर्सवरून कॉल येऊ लागले. यासर्वांना त्रस्त होवून ती तीन महिन्यांसाठी देश सोडून गेली होते.


अनोळखी कॉलमुळे त्रस्त

परत भारतात आल्यानंतरही तिला हेच सर्व पुन्हा सहन करावं लागलं. त्रस्त होऊन तिनं आपला नंबर बदलला. पण नव्या नंबरचा वापर तिनं राज कुंद्राचा सहकारी सौरभ कुशवाहसोबत बोलण्यासाठी केला होता. त्यानंतर तिच्या नवीन नंबरवरही कॉल येऊ लागले. अखेर त्रस्त होऊन तिनं पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.


सनी देओलचे या वेबसीरिजमधून डिजीटल क्षेत्रात पदार्पण



"पोलिसांचं सहकार्य नाही"

पूनमच्या वकिलानं म्हटलं की, राज आणि त्याच्या टीमविरुद्ध पोलिसांकडे मदत मागण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण तिथं आमचं ऐकलं गेलं नाही. आमची एफआयआरदेखील दाखल केली गेली नाही. त्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो


राज कुंद्रा काय म्हणाला?

आर्म्सप्राइम ही कंपनी सेलिब्रिटिंसाठी अॅप बनवते. त्या कंपनीत मी एक गुंतवणूकदार होतो.  पण डिसेंबर २०१९ मध्ये मी माझे शेअर विकले. त्यामुळे मला याबद्दल काही माहित नसल्याचं स्पष्टीकरण राज कुंद्रानं दिलं. 


सौरभ कुशवाहनं केलं आरोपांचे खंडन

राज कुंद्राचा सहकारी सौरभ कुशवाहनं पूनमनं केलेले आरोप खोटं असल्याचं सांगितलं आहे. सौरभनुसार, आर्म्सप्राइम मीडिया त्याची फर्म आहे आणि जेव्हा त्याला पूनम पांडेबद्दल कळालं तेव्हा त्यानं स्वतःच करार रद्द केला होता, असं स्पष्ट केलं



हेही वाचा

टायगर श्रॉफच्या 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित, अॅक्शनचा ट्रिपल धमाका

‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाची डोबिवलीकर अक्षया विजयी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा