Advertisement

सनी देओलचे या वेबसीरिजमधून डिजीटल क्षेत्रात पदार्पण

सनी देओल zee प्रोडक्शनच्या सीरिजमध्ये दिसणार आहे. बेवसिरिजच्या शूटिंगला मुंबईतच सुरुवात झाली आहे.

सनी देओलचे या वेबसीरिजमधून डिजीटल क्षेत्रात पदार्पण
SHARES
Advertisement

खासदार बनल्यानंतर सनी देओल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळला आहे. सनी देओल हा शेवटच्या ब्लॅक या चित्रपटात दिसला होता. पण आता तो डिजीटल क्षेत्रात पदार्पण करत आहे

सनी देओल zee प्रोडक्शनच्या सीरिजमध्ये दिसणार आहे. बेवसिरिजच्या शूटिंगला मुंबईतच सुरुवात झाली आहे. या सीरिजचे नाव G 49 असं आहे.  यात सनी देओलचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. सनीनं या वेबसीरिजमध्ये एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची नाही. तर एखाद्या आर्मी ऑफिसरची भूमिका केलेली आहे

गेलं वर्ष सनी देओलसाठी काही खास नव्हतं. सनीचा मुलगा करण देओल पल पल दिल के पास या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये उतरला. पण हा चित्रपट फारसा चालला नाही. य़िवाय सनी देओल देखील काही चित्रपटांमध्ये झळकला होता. पण तेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकले नाहीत. अखेर डिजीटल क्षेत्राची प्रसिद्धी पाहता सनी देओलनं वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला.   


हेही वाचा

बॉलिवूडमधल्या 'या' कलाकारांनी केली कॅन्सरवर मात

विकी कौशलच्या 'भूत'चा ट्रेलर प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement