Advertisement

विकी कौशलच्या 'भूत'चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर रिलीज केल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली होती. अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

विकी कौशलच्या 'भूत'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘भूत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर रिलीज केल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली होती. अखेर सोमवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

हॉन्टेड शिप’चा थरार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. मुंबईतल्या जुहूच्या समुद्र किनारी भली मोठी एक शिप येते. त्या शीपमध्ये कुणीही नसतं. नेमकं त्या शिपमध्ये काय घडलेलं असतं? याचा तपास विकी कौशल करत असतो. शोध घेण्यासाठी निघालेला विकी कौशलला तिकडे काही नकारात्मक गोष्टींचा भास होऊ लागतो. त्याच्यासोबत काय होत असतं हे त्यालाच कळतं नसतं. यातून तो कसा बाहेर पडतो? त्या शिपवर कोण असतं? हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला विकी म्हणाला की, मी या चित्रपटापासून खूप काही शिकलो आहे. मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकूनच मी आधी घाबरलो होतो. तेव्हाच मी ठरवलं हा चित्रपट करायचा. यासाठी मी खूप मेहनत घेतली. पण यासाठी मी कुठल्या हॉन्टेड जागी नाही गेले. गेले असतो तर हा चित्रपट झालाच नसता. 

चित्रपटात विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केलं आहे. तर, या चित्रपटाची करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.हेही वाचा

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

विकी कौशलवर तिचा 'सर्जिकल स्ट्राईक'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement