Advertisement

विकी कौशलवर तिचा 'सर्जिकल स्ट्राईक'

त्याला खेचत आहेत आणि विकी स्वत:ला वाचवण्यासाठी सर्व जोर लावत आहे. तो ओरडतोय, पण...

विकी कौशलवर तिचा 'सर्जिकल स्ट्राईक'
SHARES

विकी कौशलनं आपल्या दमदार अभिनयाची ‘मसान’, ‘राजी’ आणि ‘द सर्जिकल स्ट्राईक’, यांसारख्या चित्रपटात झलक दाखवली आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाची भरभरुन प्रशंसा झाल्यानंतर विकी कौशल पहिल्यांदा हॉरर चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं नाव ‘भूत- द हॉन्टेड शिप’ आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

असा आहे विकीचा लुक

भूत- द हॉन्टेड शिप’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं आहे. ज्यामध्ये विक्की कौशलचा लुक पाहायला मिळाला. यानंतर गुरुवारी चित्रपटाच्या दोन नवीन पोस्टर्सनं हजेरी लावली आहेत. पोस्टरवरील दृश्य अत्यंत भयानक आहे.

भयानक पोस्टर

पहिल्या पोस्टरमध्ये विकीभोवती काहींचे हात दिसत आहेत. जणू ते त्याला खेचत आहेत आणि विकी स्वत:ला वाचवण्यासाठी सर्व जोर लावत आहे. तो ओरडतोय, पण ते हात त्याला खेचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. तर दुसर्‍या पोस्टरमध्ये विक्की खाली पडलेल्या बाहुलीला उचलताना दिसतोय. पण त्याच्या मागे एक भयानक चेहरा दाखवला आहे. दोन्ही पोस्टर्स रंजक आणि भयानक आहेत.

द डार्क टाईम्स बिगिन नाऊ

भूत- द हॉन्टेड शिप’चं दिग्दर्शन भानु प्रताप सिंह यांनी केलं आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान या तीन निर्मात्यांनी केली आहे.

प्रचारात्मक रणनीती स्वीकारत धर्मा प्रॉडक्शननं आपला लोगोही अंधकारमय केला आहे, जो करण जोहरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिला होता. काही दिवसांपूर्वीच धर्मा प्रोडक्शनच्या सोशल मीडिया पेजवरही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओत ‘द डार्क टाईम्स बिगिन नाऊ’, अशा ओळी पाहायला मिळाल्या होत्या. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.



हेही वाचा

तापसीची सनसनीत 'थप्पड'

१०० वे मराठी नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून दरम्यान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा