Advertisement

चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा दाखवणार 'मायानगरी एक सत्य'

मुंबईला स्वप्ननगरी असं म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन इथं दररोज अनेकजण येतात. इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरचं आकर्षण अनेकांना असतं. चित्रपटसृष्टीत नाव कमवायला, नशीब आजमावयला आलेल्यांसाठी तर ही 'मायानगरी'च असते.

चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा दाखवणार 'मायानगरी एक सत्य'
SHARES

चित्रपटसृष्टीत वावरणाऱ्या बऱ्याच दिग्दर्शकांनी आजवर इथलं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता 'मायानगरी एक सत्य' हा आगामी हिंदी चित्रपट आपल्या परीनं चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. 


काळ्या बाजूवर प्रकाशझोत 

मुंबईला स्वप्ननगरी असं म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन इथं दररोज अनेकजण येतात.  इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरचं आकर्षण अनेकांना असतं. चित्रपटसृष्टीत नाव कमवायला, नशीब आजमावयला आलेल्यांसाठी तर ही 'मायानगरी'च असते. ग्लॅमरविश्वातील प्रसिद्धी अनेकांना खुणावते, पण या झगमगत्या ग्लॅमरमागचा चेहरा त्यांना दिसत नाही. त्यातूनच बरेच गैरप्रकार घडतात. चित्रपटसृष्टीच्या याच काळ्या बाजूवर प्रकाशझोत टाकणारा 'मायानगरी एक सत्य' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


वास्तववादी घटनांवरून प्रेरीत 

श्री सद्गुरू प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन बाकले करत असून, निर्माते कैलास पाटील उंडे आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ग्लॅमरच्या मोहापायी चूक किंवा बरोबर याचा सारासार विचार न करता अनेकजण चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. अशा नवोदितांसाठी 'मायानगरी एक सत्य' हा चित्रपट डोळ्यात अंजन घालणारा असल्याचं मत निर्माते, पटकथा व संवादलेखक कैलास पाटील उंडे यांनी व्यक्त केलं. 'मायानगरी एक सत्य' हा चित्रपट वास्तववादी घटनांवरून प्रेरीत असून आजवर कधीही समोर न आलेले पैलू प्रेक्षकांसमोर सादर करणारा असल्याचं गजानन बाकले यांचं म्हणणं आहे.

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, हर्षदा गुप्ते, रेखा निर्मल, पुरूषोत्तम उपाध्याय, प्रदीप पाटील, तुषार किरण, ज्ञानदेव शिंदे, गजानन बाकले, कैलास पाटील उंडे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. सहनिर्माते बाबसाहेब पारखे तर सहदिग्दर्शक तुषार नन्नवरे आहेत. चित्रपटाचं छायांकन व्ही.डी नाईक करणार आहेत. कॅमेरा सेटअप व कॉश्च्युमची जबाबदारी आयुष स्टुडिओ सांभाळणार आहे. रंगभूषा प्रदीप दादा तर वेशभूषा मुन्नादादा यांची आहे. प्रकाशयोजना किशोरभाई सांभाळत आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा