Advertisement

कंगनाला पुन्हा एकदा पोलिसांकडून समन्स जारी

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई पोलिसांनी पुन्हा समन्स जारी केला आहे.

कंगनाला पुन्हा एकदा पोलिसांकडून समन्स जारी
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई पोलिसांनी पुन्हा समन्स जारी केला आहे. कंगनाविरोधात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तक्रार केली आहे. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या प्रकरणात कंगनाची चौकशी होणार आहे. २२ जानेवारीला तिला जुहू पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जुहू पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत आणि त्यासाठीच आता कंगनाची चौकशी केली जाणार आहे.

कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केलं होतं. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीनं वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयानं कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली आहे.

वांद्रे पोलिसांनी कंगनाला ३ ते ४ वेळा नोटीस पाठवूनही कंगनानं याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंगनानं पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. आता ती जुहू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जाणार की नाही याकडे लक्ष लागलं आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा