Advertisement

राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

राखी सावंतने मुंबईतील अंधेरीमध्ये रस्त्यात मध्येच कार थांबवून ट्राफीक जाम केल्यामुळे पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात
SHARES

राखी सावंतने मुंबईतील अंधेरीमध्ये रस्त्यात मध्येच कार थांबवून ट्राफीक जाम केल्यामुळे पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथे काहीतरी खरेदी करण्यासाठी कारमधून खाली उतरली होती. मात्र ती गाडी बाजूला न लावता मधल्या रस्त्यावर उभी करून तिथून निघून गेली होती. त्यामुळे तिच्या गाडीच्या मागे गाडीच्या रांगा लागल्या होत्या. राखीचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

राखी सावंत पुन्हा गाडीजवळ आली. यावेळी ती वाहनधारकांना जहा हम खडे होते है लाईन वहीं से शुरु होती है असं म्हणत तिच्या कारमध्ये बसून पुढच्या प्रवासाला जाते. (Rakhi Sawant Latest News)

राखी सावंतच्या (Rakhi Sawant) या व्हिडिओवर चाहत्यांनी तिच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. एका यूजरने लिहिले, हे अत्यंत चुकीचे आहे, ती अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या वाहतुकीला अडथळा आणू शकत नाही, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी.

दुसरा युजर म्हणाला, "ये लडाई करवायेगी भाई किसी दिन." तर आणखी एकाने तर केस करा इस नौटंकी औरत पर." असे म्हटलं आहे. दरम्यान नेटीझन्सच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी संबंधित ठिकाण कोणतं आहे याची माहिती नेटीझन्सला विचारली होती.

अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनने राखी सावंतचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला, यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. "आम्ही वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनाविरुद्ध चलन काढले आहे." मुंबईत असे केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागतो, अशी माहिती ओशिवरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप भोसले यांनी दिली.हेही वाचा

कतरिना कैफ आणि विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा