'लायकी नसलेल्यांना महत्त्व देऊ नका'

 Wadi Bunder
'लायकी नसलेल्यांना महत्त्व देऊ नका'

पुणे - सलमान खानने पाक कलाकारांना पाठींबा देत जे वक्तव्य केलं, त्यानंतर सगळ्याच स्थरातून त्याच्या वक्तव्यावर टीका झाली. पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण करणाऱ्या बॉलिवूडच्या दबंग सलमान खानवर नाना पाटेकर यांनीही हल्ला चढवला आहे. आपले खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. त्यामुळे लायकी नसलेल्यांना उगाच महत्त्व देऊ नका, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी नाव न घेता सलमान खानवर शाब्दिक हल्ला चढवला.

'सगळ्यात आधी देश, त्यानंतर आम्ही कलाकार, कलाकारांची किंमत देशासमोर शून्य असते. ज्यांची लायकी नाही त्यांना महत्व देऊ नका, खरे हिरो आपले जवान आहेत, आम्ही नकली लोक आहोत, आम्हाला इतकं महत्त्व देऊ नका’ अशी विनंतीही नानांनी केली.

Loading Comments