Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

नवाजुद्दीन-सान्याच्या 'फोटोग्राफ'चा फर्स्ट लुक!

'ठाकरे' या सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारल्याने प्रकाशझोतात असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मार्चमध्ये एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे

नवाजुद्दीन-सान्याच्या 'फोटोग्राफ'चा फर्स्ट लुक!
SHARES

'ठाकरे' या सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारल्याने प्रकाशझोतात असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मार्चमध्ये एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. नवाजुद्दीन आणि सान्या मल्होत्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'फोटोग्राफ' या आगामी हिंदी सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.


८ मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला


दिग्दर्शक रितेश बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'फोटोग्राफ' हा सिनेमा ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर रात्रीच्या वेळी एका निर्जण रस्त्यावर चालणारे नवाजुद्दीन आणि सान्या दिसतात. यासोबतच 'यह सब एक... फोटोग्राफ के साथ शुरू हुआ' अशी लाईनही पोस्टरवर आहे, जी या सिनेमाबाबतचं कुतूहल वाढवणारी आहे. या सिनेमात सान्याने कॅालेज गर्लची भूमिका साकारली आहे.


टीझर पोस्टर लाँच


दिग्दर्शक रितेश बत्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'फोटोग्राफ'चं टीझर पोस्टर लाँच केलं आहे. त्यासोबतच 'द स्टोरी बिगीन्स...' असं म्हणत ८ मार्च रोजी संपूर्ण भारतभर 'फोटोग्राफ' प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही बत्रा यांनी केली आहे. २३ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. याखेरीज फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये याचा युरोपीय प्रीमियर करण्याची योजना आखण्यात आली आहे.


धारावीत चित्रीकरण


या सिनेमाचं बरंचसं चित्रीकरण मुंबईतील धारावी परिसरात करण्यात आलं आहे. 'लंचबॅाक्स' या बहुचर्चित सिनेमानंतर बत्रा यांनी 'फोटोग्राफ' बनवला आहे. नवाजुद्दीनचा 'ठाकरे' चर्चेत आहे, तर सान्याची मुख्य भूमिका असलेला 'बधाई हो' हा सिनेमाही प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यामुळे सतत चर्चेत असलेले दोन कलाकार आणि आशयघन सिनेमे बनवणारे दिग्दर्शक या त्रिकूटाची कमाल 'फोटोग्राफ'मध्ये पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा -

हिंदी प्रेक्षकांसोबत लक्ष्मण खेळणार 'लुका छिपी'!

राजामौलींच्या 'आरआरआर'चं दुसरं शेड्युल सुरूसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा