Advertisement

हिंदी प्रेक्षकांसोबत लक्ष्मण खेळणार 'लुका छिपी'!


हिंदी प्रेक्षकांसोबत लक्ष्मण खेळणार 'लुका छिपी'!
SHARES

काही व्यक्तींची ध्येय ठरलेली असतात. कठोर परीश्रमाच्या बळावर ते आपलं ध्येय साध्यही करतात. कारकिर्दीची सुरुवात कॅमेरामनच्या रूपात केल्यानंतर दिग्दर्शनाकडे वळलेल्या लक्ष्मण उतेकरलाही हे लागू होतं. मराठी रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी झालेला लक्ष्मण आता हिंदी प्रेक्षकांसोबत 'लुका छिपी' खेळणार आहे.


'हिंदी मीडियम', 'डिअर झिंदगी', 'इंग्लिश विंग्लिश' यांसारख्या काही हिंदी सिनेमांची अफलातून सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या लक्ष्मण उतेकरनं 'टपाल' आणि 'लालबागची राणीया मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मूळचा कोकणातील पोलादपूर येथील असलेल्या लक्ष्मणनं आजवर हिंदीत केवळ सिनेमॅटोग्राफी केली आहे. आता लक्ष्मणनं दिग्दर्शित केलेला 'लुका छिपीहा हिंदी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.


दिग्दर्शक म्हणून लक्ष्मणचा पहिला हिंदी सिनेमा असलेल्या 'लुका छिपी'चं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले कार्तिक आर्यन आणि क्रिती सनोन हे कलाकार पोस्टरवर दिसत आहेत. दोघांनी एकमेकांच्या तोंडावर बोट ठेवलं असून, क्रितीच्या हातात वरमाला, तर कार्तिकच्या हातात वराचा फेटा आहे. 'लुका छिपी'चा मराठी अर्थ लपाछपी असा आहे. त्यामुळे या सिनेमात कार्तिक आणि क्रिती कशाप्रकारची लपाछपी खेळणार आहेत ते पाहायचं आहे.

सिनेमात कार्तिक-क्रितीच्या साथीला पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि विनय पाठक हे हिंदीतील मातब्बर कलाकार आहेत. त्यामुळे लक्ष्मणनं हिंदी सिनेमांच्या चाहत्यांसाठी मांडलेला लपाछपीचा हा खेळ मजेशीर असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. 'स्त्री' आणि 'हिंदी मीडियम' या यशस्वी सिनेमांची निर्मिती करणाऱ्या मॅडॅाक फिल्म्स प्रोडक्शननं जिओ स्टुडिओजच्या साथीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. दिनेश विजान हा सिनेमा प्रस्तुत करणार आहेत. १ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'लुका छिपी'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना आता सर्वांना या सिनेमाच्या ट्रेलरचे वेध लागले आहे.


हेही वाचा

मिकाचं मराठमोळं गाणं देणार 'डोक्याला शॉट'!

'माय नेम इज लखन' म्हणत टीव्हीकडे वळला श्रेयस


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा