SHARE

गायनाइतकाच वादांमुळेही चर्चेत असणारा गायक मिका सिंग सध्या एका वेगळ्या कारणामुळे लाइमलाईटमध्ये आहे. हिंदी आणि पंजाबी गाण्यांसोबतच उडीया, कन्नड, बंगाली या प्रादेषिक भाषांमध्येही गाणी गाणाऱ्या मिकाने एक मराठमोळं गाणं गायलं आहे.

प्रथमच एखाद्या मराठी चित्रपटासाठी गायन करणाऱ्या मिकाच्या आवाजातील मराठी गाणं 'डोक्याला शॉट' या सिनेमात ऐकायला मिळणार आहे. 'डोक्याला शॉट' हा कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात काहीतरी वेगळं आणि मजेशीर पाहायला मिळणार असल्याचं शीर्षकावरूनच जाणवतं.


अमितराजचं संगीत

मिकाचा आवाज आणि त्याची गायनशैली इतरांपेक्षा खूप वेगळी असल्याने त्याच्या गाण्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यामुळे मिकाने गायलेल्या मराठी गाण्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जाणाऱ्या मिकाने 'डोक्याला शॉट' चित्रपटाचं शीर्षक गीत गायलं आहे. आजवर बरीच मराठी हिट गाणी देणाऱ्या संगीतकार अमितराजने हे शीर्षकगीत संगीतबद्ध केलं आहे.


मिकाचं मराठीत पदार्पण

'डोक्याला शॉट'चे निर्माते उत्तुंग ठाकूर यांना शीर्षकगीतासाठी उडत्या चालीच्या आणि मस्तीभरा मूड असणारा थोडा वेगळा आणि मराठीमध्ये आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज हवा होता. याच कारणामुळे त्यांनी मिकाचं नाव अमितराज यांना सुचवलं. अमितराजने क्षणाचाही विलंब न करता मिकाच्या नावाला संमती दर्शवली आणि मिकाचा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला. आता मिकाच्या स्टाइलमधील पहिलं मराठी गाणं ऐकण्यासाठी त्याचे चाहते आतुरले आहेत.

'डोक्याला शॉट' हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.हेही वाचा - 

'माय नेम इज लखन' म्हणत टीव्हीकडे वळला श्रेयस

राजामौलींच्या 'आरआरआर'चं दुसरं शेड्युल सुरूसंबंधित विषय
ताज्या बातम्या