Advertisement

'माय नेम इज लखन' म्हणत टीव्हीकडे वळला श्रेयस

'आभाळमाया', 'दामिनी', 'अवंतिका' या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्यानंतर मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये रमलेला अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा टीव्हीकडे वळला आहे. 'माय नेम इज लखन' ही श्रेयसची नवी हिंदी मालिका २६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'माय नेम इज लखन' म्हणत टीव्हीकडे वळला श्रेयस
SHARES

'आभाळमाया', 'दामिनी', 'अवंतिका' या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्यानंतर मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये रमलेला अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा टीव्हीकडे वळला आहे. 'माय नेम इज लखन' ही श्रेयसची नवी हिंदी मालिका २६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यापूर्वी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॅामेडी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसलेला श्रेयस बऱ्याच दिवसांनी एखाद्या मालिकेत काम करताना दिसणार आहे. सोनी सब वाहिनीवर सुरू होणाऱ्या या मालिकेत एका तरुणाने सुधारणेच्या मार्गावर जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कथा आहे. श्रेयससोबत या मालिकेत बॉलीवूडमधील काही गाजलेले कलाकारही आहेत. या मालिकेच्या निमित्ताने अर्चना पुरणसिंग, परमीत सेठी आणि संजय नार्वेकर प्रथमच टेलिव्हिजनच्या पडद्यावर एकत्र येत आहेत.


पुनरागमाचा आनंद

पुन्हा एकदा टीव्हीकडे वळताना जुन्या आठवणींना उजाळा देत या मालिकेबाबत श्रेयस म्हणाला की, 'माय नेम इज लखन' या मालिकेतून टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे. या मालिकेची संकल्पना भन्नाट असून, आजच्या काळाशी सुसंगत आहे. माझ्यासाठी तर ही जणू काही लाईफटाईम भूमिका आहे. आजवरच्या माझ्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीच रंगमंचावर, टीव्हीवर वा चित्रपटात साकारलेली नव्हती. त्यामुळेच सेटवरचा प्रत्येक क्षण जगत असल्याचंही श्रेयस म्हणाला.


खुमासदार शैली


श्रेयसप्रमाणेच अर्चना, परमीत आणि संजय यांचीही या मालिकेत वेगळी रूपं पाहायला मिळणार आहेत. 'माय नेम इज लखन' ही मालिका म्हणजे नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखनचा प्रवास आहे. या नव्या मार्गावरुन प्रवास करताना आपल्या स्वतःच्या 'अंदाजात' चांगल्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेकदा विनोदी प्रसंगही निर्माण होतात, त्याचं खुमासदार शैलीतील चित्रण या मालिकेत आहे.



हेही वाचा - 

राजामौलींच्या 'आरआरआर'चं दुसरं शेड्युल सुरू

दक्षिणात्य भाषेत बनणार 'उरी'चा रीमेक!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा