… आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी

ग्लोबल आयकान बनलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खाजगी जीवनात गुलाबी क्षणांचा अनुभव घेत असताना रुपेरी पडद्यावरही तिच्यासाठी आकाश गुलाबी झालं आहे. ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातील प्रियांकाचा लुक समोर आला आहे.

  • … आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी
  • … आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी
  • … आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी
  • … आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी
SHARE

ग्लोबल आयकान बनलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खाजगी जीवनात गुलाबी क्षणांचा अनुभव घेत असताना रुपेरी पडद्यावरही तिच्यासाठी आकाश गुलाबी झालं आहे. ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातील प्रियांकाचा लुक समोर आला आहे.


गुलाबी मूड

अमेरिकन गीतकार, गायक, अभिनेता निक जोनाससोबत विवाह केल्यापासून प्रियांका रिअल लाईफमधील गुलाबी क्षणांची अनुभूती घेत आहे. प्रियांका-निकचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे गुलाबी मूडमधील फोटो बरंच काही सांगून जातात. त्यामुळं प्रियांकासाठी जणू काही आकाशही गुलाबी झालं आहे. अशातच ‘द स्काय इज पिंक’ या आगामी हिंदी चित्रपटातील तिचा लुकही रिव्हील करण्यात आला आहे. या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलं आहे.


फोटो व्हायरल 

प्रियांकानं नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. चित्रपटाच्या कास्ट अँड क्रूसोबत तिनं ‘द स्काय इज पिंक’च्या शूटिंग रॅप अप पार्टीत खूप धमाल केली. प्रियांकाचे मस्तीभऱ्या मूडमधील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाची खासियत म्हणजे गतवर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांकानं लग्नसोहळ्याची तयारी करत ‘द स्काय इज पिंक’चं शूटिंग शेड्युल पूर्ण करण्यासाठी जणू तारेवरची कसरतच केली होती. ‘द स्काय इज पिंक’मधील प्रियांकाचा लुक पाहिल्यावर तिनं घेतलेली मेहनत कामी आल्याचं जाणवतं.


बाॅबकट लुक

रिव्हील केलेल्या ‘द स्काय इज पिंक’मधील फोटोत प्रियांकाचा बाॅबकट लुक पहायला मिळतो. त्यामुळं या चित्रपटात ती नेमक्या कशा प्रकारच्या भूमिकेत दिसणार याबाबत कुतूहल निर्माण होतं. या चित्रपटाचं कास्टिंग याहीपेक्षा अधिक उत्कंठावर्धक आहे. यात प्रियांकानं आदिती चौधरी आणि फरहान अख्तरनं निरेन चौधरी या व्यक्तिरेखा साकाऱल्या असून, झरीना वहाब यांनी साकारलेली आयशा चौधरी ही त्यांची मुलगी आहे. याशिवाय रोहित सुरेश सराफ यांची ही या चित्रपटात भूमिका आहे. यंदा ११ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती रानी स्क्रूवाला, सिद्धार्थ राय कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी केली आहे.
हेही वाचा -

क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?

मुक्ता-ललितच्या जगण्याचा 'श्वास'
संबंधित विषय
ताज्या बातम्या