मुक्ता-ललितच्या जगण्याचा 'श्वास'

रात्र सरल्यानंतर सकाळ होतेच. याच उक्तीप्रमाणं दुःखानंतर सुखही येणारच असतं. असाच काहीसा सकारात्मक संदेश देणारं 'स्माईल प्लीज' या आगामी मराठी चित्रपटातील 'श्वास दे...' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

SHARE

मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार 'स्माईल प्लीज' या चित्रपटात प्रथमच एकत्र आले आहेत. या चित्रपटातील त्यांचं 'श्वास दे...' हे महत्त्वपूर्ण गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे.


गाणं प्रदर्शित

रात्र सरल्यानंतर सकाळ होतेच. याच उक्तीप्रमाणं दुःखानंतर सुखही येणारच असतं. असाच काहीसा सकारात्मक संदेश देणारं 'स्माईल प्लीज' या आगामी मराठी चित्रपटातील 'श्वास दे...' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्यावर मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. गाण्यात काही ठिकाणी मुक्ता फोटोग्राफी करताना दिसत असून, अनेक सुंदर क्षण ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपते आहे. यातूनच आयुष्यात  येणारा प्रत्येक क्षण आनंदानं जगायचा असतो, असा संदेश या गाण्यातून मिळत आहे. 


चित्रीकरण एका दिवसात 

ललित आणि मुक्ताची लोकप्रियता पाहता हे गाणं सार्वजनिक ठिकाणी चित्रित करणं म्हणजे एक आव्हानच होतं. तरीही दोघांनीही धमाल, मज्जा, मस्ती करत या गाण्याचं चित्रीकरण एका दिवसात पूर्ण केलं. मंदार चोळकरनं लिहिलेल्या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिलं असून, रोहन प्रधान यांनी हे गाणं गायलं आहेत. या चित्रपटात मुक्ता-ललितशिवाय प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. उद्याचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस मनमुराद जगायला शिकवणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम फडणीसनं केलं आहे. 

LINK :  https://www.youtube.com/watch?v=shL8agaoZC4हेही वाचा-

'फिक्सर’ शुटिंग मारहाण: अभिनेत्री माही गिल आणि क्रू मेंबर्सनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

परागच्या मनात आहे तरी काय?संबंधित विषय
ताज्या बातम्या