Advertisement

अनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

प्रेगा न्यूज या प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनवणा-या आघाडीच्या कंपनीनं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

अनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
SHARES

'प्रेगा न्यूज' या प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनवणा-या आघाडीच्या कंपनीनं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. अनुष्कापूर्वी करीना कपूर खान त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती. यावेळी कंपनीनं करीना ऐवजी अनुष्काला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडलं आहे.

अनुष्का या कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर ही जाहिरात टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठी आणि हिंदीसह बंगाली गुजराती, पंजाबी, आसामी आणि उडिया या प्रादेशिक भाषांमध्ये ही जाहिरात प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे अनुष्का शर्मा लवकरच आई होणार असून जानेवारी २०२१ मध्ये बाळाला जन्म देणार आहे.या जाहिरातीमध्ये अनुष्का प्रेग्नेंसीमध्ये एक आई होण्याचा आनंद घेताना दिसणार आहे.

अनुष्का शर्मा याबद्दल बोलताना म्हणाली की, "प्रेगा न्यूज बरोबर काम करण्याचा मला आनंद आहे. प्रेगा न्यूज म्हणजेच गुड न्यूज’. हीच या ब्रँडची टॅगलाईन देखील आहे. अनेक माता प्रेगा न्यूज बरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी प्रेगा न्यूज सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे."

बेबी बंपसोबत अनुष्काने शीर्षासन करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात तिला पती विराट कोहली मदत करताना दिसला. अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले होतं की, “शीर्षासन सगळ्यात कठीण व्यायाम आहे. योगा हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी देखील मला सांगितले की, मी जास्त ताण पडणारी किंवा जास्त वाकायला लागणार नाही, अशी सर्व आसने करू शकते. परंतु, योग्य त्या सगळ्या सावधानीसहच.”हेही वाचा

रसिकांना आवडतंय 'डार्लिंग'चं टायटल साँग

२०२१ मध्ये प्रदर्शित होणार 'अपने २', देओल कुटुंबातील ३ पिढ्या झळकणार

संबंधित विषय
Advertisement