Advertisement

'रंगीला राजा' सेन्साॅरच्या कात्रीत, निहलानींची कोर्टात धाव

लवकरच प्रदर्शित होत असलेल्या 'रंगीला राजा' या त्यांच्या सिनेमातील २० दृष्यांना सेंट्रल बेर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)ने कात्री लावल्याने निहलानी यांना 'सीबीएफसी'विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

'रंगीला राजा' सेन्साॅरच्या कात्रीत, निहलानींची कोर्टात धाव
SHARES

सिनेमातील अाक्षेपार्ह दृष्यांना कात्री लावून सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेले सेन्साॅर बोर्डाचे माजी प्रमुख आणि सिनेनिर्माते पंकज निहलानी यावेळेस स्वत:च अडचणीत सापडले आहेत. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या 'रंगीला राजा' या त्यांच्या सिनेमातील २० दृष्यांना सेंट्रल बेर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)ने कात्री लावल्याने निहलानी यांना 'सीबीएफसी'विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


२५ वर्षांनी एकत्र

‘रंगीला राजा’ या सिनेमाची निर्मिती पंकज निहलानी यांनी केली असून या सिनेमात अभिनेता गोविंदा मुख्य भूमिकेत आहे. तब्बल २५ वर्षांनंतर निहलानी आणि गोविंदा सोबत काम करत आहेत. याआधी दोघांनी 'इल्जाम', 'शोला और शबनम' आणि 'आंखें' इ. सिनेमांत एकत्र काम केलं आहे.


याचिकेत आरोप

या सिनेमात कुठलीही आक्षेपार्ह किंवा अश्लील दृश्ये नसताना सेन्सॉर बोर्डाने २० दृश्ये अन्यायकारकपणे कापल्याचा आरोप निहलानी यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

एवढंच नाही, तर त्यांनी 'सीबीएफसी' प्रमुख प्रसून जोशी राजकारणाशी प्रेरीत असल्याचं सांगून त्यांच्यावरही आरोप केले आहेत. सेन्सॉर बोर्ड एखाद्या सिनेमावर २१ दिवसांत निर्णय घेते, परंतु या प्रकरणात मात्र क्रिनिंग कमिटीने ४० दिवस घेतल्याचं निहलानी यांचं म्हणणं आहे. २ नोव्हेंबर रोजी 'सीबीएफसी'ने सिनेमातील अक्षेपार्ह दृष्ये कापण्यात यावीत अशी सूचना केली होती.



हेही वाचा-

जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी नसिरूद्दीन शाह?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा