'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी नसिरूद्दीन शाह?


SHARE

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा रंगली असताना या पदासाठी नसिरूद्दीन शाह यांच्या नावाचा विचार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सुरू असल्याचं समजत आहे.


का दिला खेर यांनी राजीनामा?

अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय कामांच्या व्यस्ततेमुळे संस्थेला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचं कारण देत ३१ आॅक्टोबर रोजी राजीनामा दिला. खेर यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांना राजीनाम्याचं पत्र पाठविलं. मात्र त्यांनी प्रशासकीय मंडळाला याबाबतची कुठलीही माहिती दिली नव्हती.


मंत्रालयाची नाराजी भोवली?

खेर 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदावर वर्षभर असले, तरी त्यांनी केवळ दोनदाच संस्थेला भेट दिली. सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे झालेलं दुर्लक्ष, एफटीआयआय सोसायटी स्थापनेला लागलेला विलंब आणि महत्त्वाचं म्हणजे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमादरम्यान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची केलेली स्तुती याप्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने त्यांना जाब विचारल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.


शाह यांना विचारणा

हे पद रिक्त झाल्यानंतर मंत्रालयाने सर्वप्रथम शत्रुघ्न सिन्हा यांना या पदासाठी विचारणा केली. परंतु त्यांनी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर नसिरूद्दीन शाह यांच्या नावाचा विचार मंत्रालयाने सुरू केला. शाह एफटीआयआयचे माजी विद्यार्थी असून त्यांनी याआधी या संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. पण शाह हे पद स्वीकारतील का? हाच खरा प्रश्न आहे.हेही वाचा-

अनुपम खेर यांचा 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

अनुपम खेरांच्या शिष्या जानकी रुपेरी पडद्यावर!संबंधित विषय
ताज्या बातम्या