Advertisement

मॅट्रिक्स ४ चित्रपटात प्रियांकाची वर्णी?


मॅट्रिक्स ४ चित्रपटात प्रियांकाची वर्णी?
SHARES

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बॉलिवूडसोबतच हॉलिवूडदेखील गाजवत आहे. सध्या ही देसी गर्ल आपल्या नव्या फिल्मच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. बर्लिंनमधील काही फोटो प्रियांकानं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांका चोप्रा तिच्या मॅट्रिक्स ४ (Matrix 4) या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी जर्मनीला गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅट्रिक्स ४ हा सायन्स फिक्शन मूव्ही आहे. या प्रियांकाची भूमिका अत्यंत दमदार आहे. मॅट्रिक्स ४ मध्ये प्रियांकासोबत कियानू रिव्ह्ज (Keanu Reeves), कॅरी अ‍ॅनी मॉस (Carrie Anne Moss)ही झळकणार आहेत.


कोरोना व्हायरसचा फटका प्रियांकाच्या या फिल्मला बसला आहे. कोरोनामुळे मॅट्रिक्स ४चं शूटिंग पुढे ढकलावं लागलं होतं. या सिनेमाच्या चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण, हा सिनेमा डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा