Advertisement

निक-प्रियंका सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी!


निक-प्रियंका सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी!
SHARES

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका चोप्राच्या लग्नविषयक बातम्या रोज भारतीय मीडियामध्ये छापून येत आहेत. इंटरनॅशनल सिंगर निक जोनास आणि ग्लोबल आयकन प्रियंका चोप्राच्या लग्नाशी संबंधित घडामोडी वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये सतत दिसून आल्यानं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर 'न्यूजप्रींट मीडिया'मध्ये प्रियंका सर्वाधिक चर्चित अभिनेत्री झाली आहे.


प्रियंक-निकचा विवाह चर्चेत

निकयांकाच्या लग्नात कोण-कोण सेलेब्स येणार, लग्न कुठे आणि केव्हा होणार.. ते अगदी वर-वधू कोणती डिझाइनर वस्त्रं परिधान करणार? अशा अनेक बातम्या गेल्या आठवड्याभरात सातत्याने बऱ्याच भारतीय वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळेच मागील काही आठवड्यांमध्ये मीडियामध्ये सर्वाधिक चर्चित राहिलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर आता प्रियंका आणि निकचा विवाह चर्चेत आला आहे. यामुळेच तर गेल्या आठवड्यात तिसऱ्या स्थानी असलेली प्रियंका अचानक लोकप्रियतेत अग्रणी स्थानावर आली आहे.


प्रियंका बनली सर्वात चर्चित स्टार

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, निक जोनास आणि प्रियंका चोप्रा दोघांचीही लोकप्रियता विश्वभरात आहे. यामुळेच वृत्तपत्रांमध्ये दीपिका-रणवीरपेक्षा जास्त निकयांकाला प्रसिद्धी मिळत असलेली दिसते आहे. प्रियंकाचा शाही विवाह आणि दरदिवशी त्याविषयक येत असलेल्या बातम्यांमुळे प्रियंका न्यूजप्रिटमध्ये सर्वाधिक चर्चित स्टार बनली आहे.


६०० हून अधिक बातम्यां

१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून हा डेटा गोळा करण्यात आला आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशन, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचलं जातं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा