Advertisement

‘सिम्बा’ने झापण्यासारखं सौरभने केलं तरी काय?

सौरभसह मराठीतील बरेच आघाडीचे कलाकार सध्या एका हिंदी सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत. हा सिनेमा आहे ‘सिम्बा’. या सिनेमात सौरभही दिसणार आहे, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतंच प्रोडक्शन हाऊसकडून सौरभला झापण्यात आलं आहे.

‘सिम्बा’ने झापण्यासारखं सौरभने केलं तरी काय?
SHARES

अभिनेता सौरभ गोखलेने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत कधी लहानसहान तर कधी मोठ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सौरभसह मराठीतील बरेच आघाडीचे कलाकार सध्या एका हिंदी सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत. हा सिनेमा आहे ‘सिम्बा’. या सिनेमात सौरभही दिसणार आहे, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतंच प्रोडक्शन हाऊसकडून सौरभला झापण्यात आलं आहे.


म्हणून धरलं धारेवर...

काही कलाकार प्रसिद्धीपासून कायम दूर राहत स्वत:चं काम करण्यात धन्यता मानतात, पण याउलट काहींना मात्र कायम प्रकाशझोतात राहायला आवडतं. सौरभलाही अशाच काहीशा स्वभावाचा फटका बसल्याचं समजतंय. ‘सिम्बा’मध्ये सौरभप्रमाणेच इतरही बरेच मराठी कलाकार आहेत. कोणीही सिनेमाबाबत काही सांगायचं नाही, सेटवरील फोटो कोणाशी शेअर करायचे नाहीत, सेटवरील माहिती बाहेर द्यायची नाही असं सांगूनही सौरभने नेमकं तेच केल्याने प्रोडक्शन हाऊसने त्याला धारेवर धरल्याचं चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून समजतं.



संयमाचा बांध फुटला

‘सिम्बा’सारखा बहुचर्चित सिनेमा, रोहित शेट्टीचं दिग्दर्शन, रणवीर सिंगसारखा नायक, करण जोहरचं प्रोडक्शन असलेल्या एका बड्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने सौरभला खूप आनंद झाला. या आनंदाच्या भरात त्याने प्रसारमाध्यमांशी या सिनेमाविषयीची माहिती शेअर केली. त्यावरून सौरभच्या अनुषंगाने बातम्याही प्रकाशित झाल्या. तरीही प्रोडक्शन हाऊसने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण सौरभ इथेच थांबला नाही. त्याने सेटवरील एक फोटोही शेअर केल्याचं समजतं. ज्यात मागे सिनेमातील इतर मराठी कलाकारही बसलेले दिसत होते. या फोटोनंतर मात्र प्रोडक्शन हाऊसच्या संयमाचा बांध फुटला.


नियमाचा भंग

चित्रीकरणासाठी करण्यात आलेल्या कराराचा भंग होत असल्याचं सांगत प्रोडक्शन हाऊसच्या वतीने सौरभला सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती ‘सिम्बा’ सिनेमाशी संबंधित असलेल्या सूत्रांकडून मिळाली आहे. करण जोहर, हिरू यश जोहर, रोहित शेट्टी, इशा अंबानी आणि अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात रणवीर सिंग शीर्षक म्हणजेच एसीपी संग्राम भालेरावच्या भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला सारा अली खान, आशुतोष राणा, सुरोश ओबेराॅय, सोनू सूद, झाकीर हुसेन आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

सौरभखेरीज विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, नंदू माधव, सुचित्रा बांदेकर यांसारखे काही मराठी कलाकारही या सिनेमात आहेत, पण गोपनियतेच्या कारणावरून सध्या कोणीही या सिनेबाबत जास्त बोलायला तयार नाही.



हेही वाचा-

त्रास देणाऱ्याचा रणवीर घेणार क्लास

शाहिद स्वत:ला मानतो लकी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा