Advertisement

शाहिद स्वत:ला मानतो लकी!


शाहिद स्वत:ला मानतो लकी!
SHARES

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या सिनेमात राजा रतन सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता शाहिद कपूर ‘बत्ती गुल मीटर चालू’ या आगामी हिंदी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची कथा सामाजिक मुद्द्यावर आधारित आहे. अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने तो स्वत:ला लकी मानतो.


काय म्हणाला शाहिद?

आजवरच्या १५ वर्षांच्या करियरमध्ये विविधांगी भूमिका साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत शाहिदने आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा त्याच वाटेवरील पुढचं पाऊल असल्याचं मानणारा शाहिद म्हणतो, हा सिनेमा एका सामाजिक मुद्द्यावर प्रकाश टाकणारा आहे. अशा प्रकारच्या सोशल इश्यूंवरील चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो.


वास्तव मांडणारा सिनेमा

‘हैदर’ या सिनेमात ह्युमन राइट्सचा मुद्दा होता, तर ‘उडता पंजाब’मध्ये तरुणाईमध्ये वाढत असलेल्या नशेच्या प्रमाणावर भाष्य करण्यात आलं होतं. हे दोन्ही मुद्दे खूपच डार्क असल्यानं त्यांची प्रेक्षकसंख्याही मर्यादित होती, पण ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमाचा विषय प्रत्येकाच्या घरातील वास्तव मांडणारा आहे.


'या' कलाकारांच्या भूमिका

‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमात शाहिदसोबत श्रद्धा कपूर, यामी गौतम, दिव्येंदु शर्मा, सुधीर पांडे, फरीदा जलाल, सुप्रिया पिळगावकर, अतुल श्रीवास्तव, आशुतोष झा आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. टीसिरीज आणि किर्ती पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनी केलं आहे.


हेही वाचा - 

‘मंटो’साठी अहमदाबादमध्ये वसवलं पाकिस्तान

‘कान’नंतर ‘सिडनी’मध्ये ‘मंटो’ची वर्णी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा