Advertisement

‘मंटो’साठी अहमदाबादमध्ये वसवलं पाकिस्तान

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असणारा आणखी एक महत्त्वपूर्ण सिनेमा ‘मंटो’ आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात नवाजुद्दीनने कवी सदात हसन मंटो यांची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शिका नंदिता दास यांना या सिनेमातील काही भाग पाकिस्तानात चित्रीत करायचा होता, परंतु परवानगी न मिळाल्याने त्यांनी अहमदाबादमध्येच पाकिस्तानचा सेट उभारला.

‘मंटो’साठी अहमदाबादमध्ये वसवलं पाकिस्तान
SHARES

सिनेसृष्टीतील कला दिग्दर्शकांना आधुनिक युगातील विश्वकर्मा असं म्हटलं जातं. कारण एखादं ठिकाण किंवा वास्तू हुबेहूब उभारून खऱ्याप्रमाणे आभास निर्माण करण्याची कला त्यांच्या अंगी असते. ‘मंटो’ सिनेमासाठीही असाच एक सेट उभारण्यात आला होता, जो खरं तर होता अहमदाबादमध्ये, पण भासवण्यात आलं आहे पाकिस्तान.


मंटो' प्रदर्शनाच्या वाटेवर

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असणारा आणखी एक महत्त्वपूर्ण सिनेमा ‘मंटो’ आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात नवाजुद्दीनने कवी सदात हसन मंटो यांची भूमिका साकारली आहे.

दिग्दर्शिका नंदिता दास यांना या सिनेमातील काही भाग पाकिस्तानात चित्रीत करायचा होता, परंतु परवानगी न मिळाल्याने त्यांनी अहमदाबादमध्येच पाकिस्तानचा सेट उभारला. याच ठिकाणी ‘मंटो’मधील महत्त्वपूर्ण दृश्यांचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.


सिनेमाची कथा?

या सिनेमात प्रेक्षकांना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कथा पाहायला मिळेल. तो ऐतिहासिक काळ दाखवताना कुठेही तडजोड होऊ नये यासाठी एक सेट उभारून पाकिस्तानसारखं लोकेशन तयार करण्यात आलं. पाकिस्ताानमध्ये शूट करण्याची परवानगी नाकारल्यानंतर या सिनेमाच्या कला दिग्दर्शिका रीटा घोष यांनी अहमदाबादमध्ये सेट उभारण्याची जबाबदारी स्वीकारत ती लीलया पारही पाडली.


अहमदाबादमध्ये लाहोरचा सेट

रीटा यांनी ‘मंटो’साठी पाकिस्तानातील लाहोर शहराचा सेट उभारला होता. याबाबत रीटा म्हणाल्या, पाकिस्तानमध्ये शूटिंगची परवानगी नाकारल्यानंतर आमच्या टिमने चंदीगढ, लुधियाना आणि अहमदाबाद येथील लोकेशन्सची पाहणी केली. त्यातून अहमदाबादमध्ये लाहोरचा सेट उभारण्यात आला. यासाठी आमच्या संपूर्ण टिमने कठोर मेहनत घेतली आहे. याची अनुभूती प्रेक्षकांना सिनेमा पाहताना नक्कीच येईल.

या सिनेमात नवाजुद्दीनसोबत रसिका दुगल आणि ताहिर राज भसीन यांच्या मुख्य भूमिका आहेत. एचपी स्टुडिओ, फिल्मस्टोक आणि वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स यांची सहनिर्मिती असलेला ‘मंटो’ हा सिनेमा २१ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा - 

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा 'दोस्तीगिरी'!

भारतीय हाॅकीतल्या ‘गोल्ड’न क्षणांची आठवण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा