Advertisement

जन्मदिन विशेष - जाणून घ्या राज कपूर यांच्या काही उत्कृष्ट सिनेमांविषयी


जन्मदिन विशेष - जाणून घ्या राज कपूर यांच्या काही उत्कृष्ट सिनेमांविषयी
SHARES

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी शैली निर्माण करणारे अभिनेता राज कपूर यांचा गुरुवारी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी ९३ वा जन्मदिवस! भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांना 'शोमॅन' म्हणून ओळखलं जातं. साचेबद्ध चौकट मोडून भारतीय सिनेमांना एक वेगळं वळण देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना ३ राष्ट्रीय आणि ११ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.



त्यांच्या ९३ व्या जन्मदिनाच्या निमित्तानं जाणून घ्या त्यांचे काही उत्कृष्ट सिनेमा


बरसात (१९४९)

राज कपूर यांनी बरसात या सिनेमात पहिल्यांदाच दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्याची भूमिका बजावली. या सिनेमात नर्गिस ही त्यांची अभिनेत्री होती. या सिनेमापासूनच या दोघांच्या अफेअरचे किस्से सुरू झाले.


आवारा (१९५१)

आवारा हा सिनेमा फक्त देशातच नाही परदेशातही गाजला. या सिनेमात राज कपूर म्हणजेच राजू आपल्या वडिलांपासून दुरावलेले असतात. आपल्याला आई-वडिलांपासून लांब करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीची राजू हत्या करतो. त्यानंतर राजूला न्यायालयात हजर केले जाते. तेव्हा न्यायाधीश म्हणून त्याच्या समोर खुद्द त्याचे वडील बसलेले असतात.


श्री ४२० (१९५५)

या सिनेमात राज कपूर यांचं नाव रणबीर राज असं असतं. या सिनेमाची कथा उद्देशरहीत मुलावर आधारीत आहे. ज्याला काहीतरी मिळवायचं असतं आणि तो मुंबईला स्थायिक होतो. सिनेमात रणबीर राज पैसे कमवण्यासाठी अयोग्य मार्गाचा अवलंब करतो.


संगम (१९६४)

'संगम' या सिनेमात राज यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून आजही दाद दिली जाते. त्यांनी या सिनेमात कधी निर्दयी तर कधी दयाळू या दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.


मेरा नाम जोकर (१९७०)

या सिनेमातही पुन्हा एकदा राज कपूर यांचं नाव राजू असतं. चार तासांच्या या सिनेमात राजू लहानपणापासून सर्कसमध्ये काम करत असतो. या सिनेमाची कथा जीवनात कितीही मोठं संकट आलं, तरी शो मस्ट गो ऑन ही शिकवण आपल्याला देऊन जातो.

राज कपूर यांना १९७१ मध्ये पद्मभूषण, तर १९८७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा