Advertisement

रजनीकांत-अमिताभ बच्चन ३३ वर्षांनी चित्रपटात एकत्र दिसणार

जेलर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले होते.

रजनीकांत-अमिताभ बच्चन ३३ वर्षांनी चित्रपटात एकत्र दिसणार
SHARES

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा जेलर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले होते. आता रजनीकांतचा नवा चित्रपट 'थलैवर 170' तयार होत आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन 33 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 

रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.  फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “33 वर्षांनंतर मी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'थलैवर 170' मध्ये काम करणार आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करणार आहेत."  

25 ऑक्टोबर 2023 मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थलैवर 170' वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित आहे. रजनीकांत पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 'हम', 'अंधा कानून' आणि 'अटक' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रजनीकांत आणि अमिताभ यांच्याशिवाय या चित्रपटात राणा दग्गुबती, फहद फासिल, रितिका सिंग, मंजू वॉरियर आणि दसरा विजयन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अरिरुद्ध रविचंद्र आहेत. शाहरुखच्या 'जवान' या सुपरहिट चित्रपटासाठी अनिरुद्धने स्वतः संगीत दिले होते.



हेही वाचा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा