Advertisement

'बधाई हो'नंतर 'बधाई दो' सिक्वेलची घोषणा, राजकुमार राव-भूमी पेडणेकरची जोडी ठरली

'बधाई दो' असं या चित्रपटाचं नाव आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

'बधाई हो'नंतर 'बधाई दो' सिक्वेलची घोषणा, राजकुमार राव-भूमी पेडणेकरची जोडी ठरली
SHARES

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' या चित्रपटाचा आता लवकरच सिक्वेल येणार आहे. 'बधाई दो' असं या चित्रपटाचं नाव आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

'बधाई हो'चे निर्माते जंगली पिक्चर्सने नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'बधाई दो'मध्ये राजकुमार राव दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जो महिला पोलिस ठाण्यातील एकमेव पुरुष अधिकारी असतो. तर चित्रपटात भूमी ही पीटी टीचरची भूमिका साकारताना दिसेल. ‘बधाई दो’ या चित्रपटाची पटकथादेखील बधाई होचे लेखक अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी यांची आहे. तर हर्षवर्धन कुलकर्णी याचे दिग्दर्शक आहेत.

राजकुमार राव म्हणाला की, हळूहळू गोष्टी सुरळित होत आहेत, याचा मला आनंद आहे. बधाई दो हा माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. यातील भूमिकेबद्दल मला आनंद आहे. ही अशी एक व्यक्ती आहे, जिच्या अवती भोवती खूप समस्या आहेत, ज्याचे त्याला निराकरण करायचे आहे.

दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी म्हणाले की, कौटुंबिक ड्रामा कायम एव्हरग्रीन असतो. संपूर्ण कुटुंबासमवेत बसून याचा आनंद घेता येतो. राजकुमार रावसोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे आणि याबद्दल मी खूप उत्साही आहे. कोरोनाच्या काळात, आम्हाला अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला आणि राजकुमार आणि भूमी यांची केमिस्ट्रीदेखील खूप छान जुळून आली आहे.हेही वाचा

अभिषेक बच्चन, राजकुमार राव स्टारर 'लुडो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रसार भारतीचा मोठा निर्णय, PTI, UNI चं सबस्क्रिप्शन रद्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement