रणवीरचा रेट्रो लूक


SHARE

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा पूरच आला आहे. आता त्यात १९८३ मध्ये वर्ल्ड कपवर आधारित चित्रपट '83' ची भर पडली आहे. यामध्ये रणवीर सिंह, कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. फिल्मसाठी तो क्रिकेटच्या मैदानावर कडक मेहनत घेत आहे. नुकताच त्यानं एक फोटो शेअर केला आहे. यात त्याचा ८० च्या दशकातील लूक पाहायला मिळत आहे. मंगळवारी रणवीरनं इंस्टाग्राम अकाउंटवर रेट्रो लुकमध्ये ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेयर केला आहे.View this post on Instagram

रेट्रो

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


१०० दिवसांचं शूटिंग

फोटोमध्ये त्याचे लांब लांब केस दिसत आहे. सोबतच लांब आणि अनफिनिश्ड मिशा दिसत आहेत. फिल्मचे शूटिंग मे पासून लंडनमध्ये सुरु होईल. यासाठी १५ मे पासून १०० दिवसांच्या शूटिंगचे शेड्यूल ठरवले गेले आहे. यामध्ये भारताचा वर्ल्ड कप जिंकणे आणि टीमचा स्ट्रगल दाखवला गेला आहे.


धर्मशाळा स्टेडियममध्ये प्रॅक्टिस

मागील काही दिवसात फिल्मची कास्ट खऱ्या विनिंग टीमसोबत धर्मशाळा स्टेडियममध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी पोहोचली होती. पूर्ण टीमनं येथे वर्ल्ड कप टीमच्या काही खेळाडूंसोबत सराव आणि चर्चा केली. माजी अंडर १९ क्रिकेटर राजीव मेहरा आणि माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंह संधू टीमचे फिटनेस कोच आहेत. यामध्ये पंकज त्रिपाठी मॅनेजरच्या रोलमध्ये दिसणार आहेत. साकिब सलीम, चिराग पाटिल, हार्डी संधू, ताहिर राज भसीन आणि आदिनाथ कोठारे फिल्ममध्ये प्लेयर्सच्या भूमिका साकारणारा आहेत.
संबंधित विषय
ताज्या बातम्या