लैंगिक शोषणासंदर्भात रिचा चड्डाचा खुलासा

  रिचा चड्डा म्हणाली की, लैंगिक शोषणासंदर्भात आपण बोलत असू, तर बॉलिवूडला अनेक हिरो गमवावे लागतील.

  Mumbai
  लैंगिक शोषणासंदर्भात रिचा चड्डाचा खुलासा
  मुंबई  -  

  हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीननं अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केल्याचा खुलासा केला आणि सोशल मीडियावर बघता बघता अनेक महिलांनी #MeToo या हॅशटॅगखाली अापले अनुभव शेअर केले. कॉमेडिअन मल्लिका दुवा, तारक मेहता फेम मुनमुन दत्त यांनीदेखील यासंदर्भात आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले. यात आता आणखी एक नाव समोर येत आहे. अभिनेत्री रिचा चड्डानं यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

  रिचा चड्डा म्हणाली की, लैंगिक शोषणासंदर्भात आपण बोलत असू, तर बॉलिवूडला अनेक हिरो गमवावे लागतील. मला नाही वाटत की भारतात लवकर असं काही घडेल. कारण आपल्या देशात पीडितेचे नाव समोर आणून तिला बदनाम करण्याची पंरपरा नाही. पण समजा असं झालं, तर परिस्थिती पूर्ण बदललेली असेल.

  रिचा चड्डा हे देखील म्हणाली की, आता महिला हळूहळू का होईना, लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत आहेत. चार पाच वर्षांनंतर अनेक महिला समोर येतील आणि लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवतील.

  हॉलिवूडमध्ये अॅक्टर्सना वेगळी आणि चांगली वागणूक दिली जाते. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांना काम मिळत नाही, अशी परिस्थिती येत नाही. पण बॉलिवूडमध्ये असं कुणी केलं, तर त्याला याची मोठी किंमत चुकवावी लागते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये कुणी लैगिक शोषणाविरोधात बोलत नाहीअसं बोलून रिचा चड्डानं बॉलिवूडची दुसरी बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.  हेही वाचा

  विराट आणि अनुष्का यांचं लवकरच शुभमंगल?


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.