Advertisement

सलमानच्या फिल्मी करिअरसाठी सलीम खान बोलले खोटं!


सलमानच्या फिल्मी करिअरसाठी सलीम खान बोलले खोटं!
SHARES

अभिनेता सलमान खान बुधवारी म्हणजेच २७ डिसेंबरला ५२ वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस आणि 'टायगर जिंदा है' चित्रपटाला मिळालेलं यश अशा दोन्ही गोष्टी त्यानं एकत्रच साजऱ्या केल्या. फक्त 'टायगर जिंदा है' चित्रपटच नाही, तर आत्तापर्यंत सलमान खानच्या १२ चित्रपटांनी १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. पण 'टायगर जिंदा है' चित्रपटानं देखील सलमान खानचा स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे. सलमानच्या 'टायगर जिंदा है' चित्रपटानं फक्त चार दिवसात १५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे.



सलमान खाननं आपल्या करिअरची सुरुवात जे. के. बिहारी यांच्या चित्रपटातून केली होती. १९८८ साली आलेल्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटात सलमान खाननं साईड रोल केला होता. पण सूरज बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे सलमान खानला खरी ओळख मिळाली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपर-डुपर हिट झाला होता.


सलमानसाठी खोटं बोलले सलीम खान

सलमान खाननं 'मैने प्यार किया' सारखा हिट चित्रपट दिला होता. पण त्यानंतर त्याला चित्रपट मिळेनासे झाले. ६ महिने सलमानकडे कामच नव्हते. सलमानचे वडील सलीम खान त्याच्या फिल्मी करिअरला घेऊन चिंतेत होते. अशा परिस्थितीत सलीम खान यांनी निर्माता-दिग्दर्शक जी. पी. सिप्पी यांची मदत घेतली. सलीम खान जी. पी. सिप्पी यांना म्हणाले की, सलमानला सध्या चित्रपट मिळत नाहीत. त्यामुळे सलमानला तुम्ही तुमच्या चित्रपटासाठी साईन केलं आहे, अशी खोटी अनाऊन्समेंट करा.



सलीम खान आणि जी. पी. सिप्पी यांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी सलीम खान यांचं म्हणणं मान्य केलं. जी. पी. सिप्पी यांनी घोषणा केली की, त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सलमानला साईन केलं आहे. ट्रेड गाईड मॅगजिनमध्ये ही बातमी छापली गेली. मार्केटमध्ये ही खबर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सलमान खानकडे चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या.


जी. पीसिप्पी यांना देखील झाला फायदा

जी. पी. सिप्पी यांना देखील या खोट्या अनाऊन्समेंटचा फायदा झाला. टिप्स कंपनीकडून जी. पी. सिप्पी यांना पाच लाख रुपये देण्यात आले. जी. पी. सिप्पी यांच्या चित्रपटात सलमान खानवर गाणं चित्रीत करण्यात यावं, यासाठी ते पाच लाख रुपये देण्यात आले होते. खोटी अनाऊन्समेंट सलमान खानसाठी खरी ठरली आणि त्याला जी. पी. सिप्पी यांचा 'पत्थर के फूल' हा चित्रपट खरच मिळाला!    



१२ फेब्रुवारी १९९१ रोजी 'पत्थर के फूल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. फक्त चित्रपटच नाही, तर या चित्रपटाची गाणी देखील तुफान चालली. या चित्रपटासाठी सलमान खानला ३१ हजार मानधन मिळणार होते. पण, चिपटाला मिळालेलं यश पाहता सलमानला ७५ हजार इतकं मानधन मिळालं. यानंतर सलमाननं कधी मागं वळून पाहिलं नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा