Advertisement

सलमानचा भावोजी बनणार आर्मी आफिसर

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच नवोदितांना ब्रेक देणाऱ्या सलमान खाननं भावोजी आयुष शर्माला 'लव यात्री' या चित्रपटाद्वारे लाँच केलं आहे. पहिल्या चित्रपटात चॅाकलेट बॅायची भूमिका साकारणारा आयुष आता आर्मी आॅफिसर बनणार आहे.

सलमानचा भावोजी बनणार आर्मी आफिसर
SHARES

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच नवोदितांना ब्रेक देणाऱ्या सलमान खाननं भावोजी आयुष शर्माला 'लव यात्री' या चित्रपटाद्वारे लाँच केलं आहे. पहिल्या चित्रपटात चॅाकलेट बॅायची भूमिका साकारणारा आयुष आता आर्मी आॅफिसर बनणार आहे.


बॅालिवुडचा मार्ग

सलमान खाननं बऱ्याच कलाकारांच्या मुलांना आणि नातेवाईकांना बॅालिवुडचा मार्ग दाखवला आहे. यात सलमानच्या काही नातेवाईकांचाही समावेष आहे. नातेवाईकांसाठी सलमाननं चक्क चित्रपटांची निर्मितीही केली आहे. सलमानला अत्यंत प्रिय असलेल्या बहिण अर्पिताचा पती आयुष शर्माला सलमाननं होम प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या 'लव यात्री' या चित्रपटाद्वारे बॅालिवुडमध्ये आणलं. हा चित्रपट पूर्णपणे फ्लॅाप ठरला आणि आयुषच्या करियरला जणू ब्रेकच लागला. आयुषचं करियर केवळ एकाच चित्रपटापुरतं मर्यादित राहतं की काय असं वाटत असताना तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज होत असल्याची माहिती मिळाली आहे.


नामी संधी

सुनिल जैन आणि आदित्य जोशी यांच्या कल्ट एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनणाऱ्या 'क्वथा' या आगामी हिंदी चित्रपटात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी आयुषला मिळाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण ललित बुतानी करणार आहेत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या जॅकी श्राफ, जिमी शेरगिल, केके मेनन, श्रीया सरन अभिनीत 'फेमस' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेले बुतानी 'क्वथा'मध्ये सत्य घटनांवर आधारित कथानक सादर करणार आहेत. काही घटना एखाद्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आणि मत कशा प्रकारे बदलू शकतात यावर या चित्रपटाचं कथानक आधारित आहे.


सप्टेंबरमध्ये शूटिंग

'क्वथा' हा अॅक्शन-ड्रामा असून, यात आयुष एका आर्मी मेजरच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं आयुष मानतो. या चित्रपटात आयुष अतिशय वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. यासाठी सध्या तो आपल्या बॅाडी आणि लुकवर काम करत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या चित्रपटात मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आयुष कठोर मेहनत घेत असल्याचं समजतं. या चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे.



हेही वाचा -

'बलिदान बॅज'प्रकरण: बीसीसीआय मांडणार धोनीची बाजू

'बिग बॉस'च्या घरात रहाण्यास शिवानी-वीणा अपात्र!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा