Advertisement

'बलिदान बॅज'प्रकरण: बीसीसीआय मांडणार धोनीची बाजू

महेंद्रसिंह धोनीनं पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडं असलेलं विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेल ग्लोव्हज वापरले होते. या प्रकरणी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आक्षेप घेतला आहे.

'बलिदान बॅज'प्रकरण: बीसीसीआय मांडणार धोनीची बाजू
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीनं घातलेल्या ग्लोव्हजवरील पॅरा कमांडोजच्या मानचिन्ह म्हणजेच 'बलिदान बॅज' हे प्रकरण खूपचं रंगत आहे. वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीनं पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडं असलेलं विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेल ग्लोव्हज वापरले होते. या प्रकरणी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आक्षेप घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामन मंडळानं (बीसीसीआय) धोनीला ग्लोव्हजवरी हे मानचिन्ह हटवण्यास सांगावं, असं आवाहन आयसीसीनं बीसीसीआयला केलं आहे. परंतु, सोशल मीडियावर अनेकांनी धोनीला पाठिंबा दर्शवला आहे.


या मुद्द्यावर चर्चा

या प्रकरणावर बीसीसीआयच्या मुख्यालयात शुक्रवारी दुपारी बैठक होणार असून, बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मात्र, आम्ही आमच्या खेळाडूच्या बाजूनं ठामपणे उभे असल्याचं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटलं आहे. धोनीच्या ग्लोव्हजवरील मानचिन्ह हे कुण्या धर्माचं प्रतिक नाही, तसंच ते व्यावसायिक स्वरूपाचं देखील नाही. यावर हे ग्लोव्हज घालण्यापूर्वी आयसीसीची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सांगितले जात आहे, मात्र आम्ही ग्लोव्हजवरील चिन्हांसाठी आयसीसीकडं परवानगी मागणार आहोत, असंही राय यांनी स्पष्ट केलं आहे.


धोनीचं समर्थन

मानचिन्हांकित ग्लोव्हज घालण्याच्या मुद्द्यावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी धोनीचं समर्थन केलं जात आहे. तसंच, ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग असून हा हॅशटॅग वापरून अनेकांनी धोनीच्या या कृतीचं समर्थन केलं आहे.


पॅरा कमांडोचं प्रशिक्षण

'बलिदान चिन्ह' हे चिन्ह पॅरा कमांडोच्या सदस्यांनाच वापरण्याची परवानगी मिळते. धोनीला २०११ साली लष्करातील लेफ्टनंट कर्नलची मानद रँक देण्यात आली होती. त्यानंतर धोनीनं पॅरा कमांडो होण्याचं प्रशिक्षणही घेतलं होतं. धोनीनं वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पॅरा कमांडोचं चिन्ह असलेलं ग्लोव्हज घालून सैन्यदलाप्रती आदर व्यक्त केला.



हेही वाचा -

भाजपाचा युवा मोर्चा अध्यक्ष बँकेचा ‘विलफूल डिफाॅल्टर’!

पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा