Advertisement

भाजपाचा युवा मोर्चा अध्यक्ष बँकेचा ‘विलफूल डिफाॅल्टर’!

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहीत भारतीय याला बँक आॅफ बडोदाने विलफूल डिफाॅल्टर (हेतूपुरसर कर्ज बुडवणारा) घोषित केला आहे. एवढंच नाही, तर बँकेने मोहीत आणि जितेंद्र कपूर यांचा फोटो वृत्तपत्रांमध्ये देखील छापला आहे.

भाजपाचा युवा मोर्चा अध्यक्ष बँकेचा ‘विलफूल डिफाॅल्टर’!
SHARES

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहीत भारतीय याला बँक आॅफ बडोदाने विलफूल डिफाॅल्टर (हेतूपुरसर कर्ज बुडवणारा) घोषित केला आहे. एवढंच नाही, तर बँकेने मोहीत आणि जितेंद्र कपूर यांचा फोटो वृत्तपत्रांमध्ये देखील छापला आहे. त्यांच्या अयान आॅर्नामेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बँकेकडून घेतलेलं कोट्यवधी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.    

अब्रुनुकसानीचा दावा

बँक ऑफ बडोदाच्या वसुली विभागाद्वारे ही प्रसिद्धी जाहीरात देण्यात आली आहे.त्यावर मोहीत भारतीयने बँकेविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. मोहीतने एक पत्र लिहित स्पष्ट केलं आहे की, अयान आॅर्नामेंट प्रा. लि. वर हे कर्ज आहे. सद्यस्थिती मी या कंपनीच्या कुठल्याही पदावर नाही. कंपनीच्या संचालकपदाचा मी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. तसंच २०१३ साली झालेल्या या व्यवहारात मी केवळ कंपनीचा गॅरेंटर होतो. मी कंपनीच्या बँक ड्यू पेड केल्या आहेत. बँकेची एकूण कर्जाची रक्कम ९० कोटी रुपये होती, त्यापैकी ७६ कोटी रुपये मी मागील २ वर्षांत बँकेकडे जमा केल्याचं भारतीय यांनी सांगितलं.  

तर, प्रत्येक पैसा परत करेन

या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजूने लागला आहे. माझ्यावर कुठलंही कर्ज असल्याचं बँकेने सिद्ध केल्यास मी बँकेचा एकूण एक पैसा परत करेन, असंही मोहीत यांनी पत्रात म्हटलं आहे. अयान आॅर्नामेंटमध्ये डायमंड आणि जेमस्टोन कटींग तसंच पाॅलिशिंगचं काम करण्यात येतं. या कंपनीची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली होती.      

निवडणूक देखील लढवली

मोहीत भारतीय यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. परंतु त्यांना पराभव सहन करावा लागला. ३५० कोटी रुपयांची मालमत्ता असणारे ते मुंबईतील श्रीमंत उमेदवार हाेते. मोहीत भारतीय यांचं मूळ नाव मोहीत कंबोज होतं. परंतु या वर्षी जानेवारीत त्यांनी आपलं आडनाव बदलून भारतीय असं केलं. 

 


हेही वाचा-

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रीपद धोक्यात?

रांगेचा वाद हा विषय मोठा नाही, तो आता संपायला हवा - शरद पवार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा