Advertisement

शाहरुखची बर्थडे पार्टी मुंबई पोलिसांनी केली बंद


शाहरुखची बर्थडे पार्टी मुंबई पोलिसांनी केली बंद
SHARES

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने शुक्रवारी आपला 53वा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला. यावेळी त्याने आपल्या मित्रांसाठी वांद्र्यातील एका रेस्टॉरंटमध्ये एक पार्टी होस्ट केली होती. मात्र त्याचवेळी पोलिस तेथे दाखल झाले आणि त्यांनी ही पार्टी बंद पाडली. 


का पाडली बंद?

शाहरुखची बर्थडे पार्टी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी ही पार्टी बंद करायला लावली. हे रेस्टॉरंट रोज रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतं. मात्र शुक्रवारी शाहरुखच्या पार्टीदरम्यान हे हॉटेल रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होतं. शिवाय म्युझिकही मोठ्या आवाजात सुरू होता. त्या आवाजाने पोलिस तिथे पोहचले आणि त्यांनी म्यूझिक बंद करायला सांगितल्यानंतर शाहरुखची पार्टी संपली आणि तो रेस्टॉरंटमधून मित्रांसोबत बाहेर पडला.    

शाहरुखच्या या लेट नाईट पार्टीत निखिल आडवाणी, संगीतकार अजय-अतुल, आनंद एल राय आणि कोरियोग्राफर बोस्को-कैसर सहभागी झाले होते. त्याच्या वाढदिवशीच झिरो या सिनेमाचा ट्रेलर लाँच केल्यानंतर शाहरुखने आपल्या जवळच्या मित्रांसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा