Advertisement

शाहिदचा 'बत्ती गुल मीटर चालू' २൦१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!


शाहिदचा 'बत्ती गुल मीटर चालू' २൦१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!
SHARES

शाहिद कपूर सध्या 'पद्मावती' चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे. 'पद्मावती' चित्रपटात शाहिदनं राजा रावल रतन सिंहची व्यक्तीरेखा साकारली आहे. 'पद्मावती'नंतर शाहिद कपूर आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.

'बत्ती गुल मीटर चालू' या शाहिदच्या आगामी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. तरन आदर्शनं ट्वीट करत चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. ३१ ऑगस्ट २൦१८ म्हणजेच पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नारायण सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नारायण सिंह यांनी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'टॉयलेट-एक प्रेमकथा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा सिनेमा भलताच लोकप्रिय ठरला होता.


१८ ऑक्टोबरला 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला होता. मात्र, यात शाहिद कपूरची मात्र झलक दिसली नाही. आता या चित्रपट प्रदर्शनाची अंतिम तारीख घोषित झाली आहे. त्यामुळे 'पद्मावती'नंतर शाहीद पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा

'शादी में जरूर आना' पाहायला जाताय? त्याआधी हे नक्की वाचा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा