Advertisement

रुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’

आजवर बऱ्याच ऐतिहासिक नायकांनी रुपेरी पडद्यावर हजेरी लावली आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरही हिंदी चित्रपटाच्या माध्यामतून सर्वदूर पोहोचणार आहेत.

रुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’
SHARES

आजवर बऱ्याच ऐतिहासिक नायकांनी रुपेरी पडद्यावर हजेरी लावली आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरही हिंदी चित्रपटाच्या माध्यामतून सर्वदूर पोहोचणार आहेत.

मोहनदास करमचंद गांधी आणि विनायक दामोदर सावरकर ही दोन्ही नावं एकमेकांशी कायमची जोडली गेली आहेत. सावरकरांचं नाव घेतलं की गांधीजींचं नाव आणि गांधीजींचं नाव घेतलं की सावरकरांचं नाव आठवतंच. एवढा या दोन्ही नावांचा एकमेकांशी अनन्य साधारण संबंध आहे. गांधी खून खटल्यात सहभागी असल्याचा आरोप झालेल्या युगपुरुष सावरकरांच्या पुढील आयुष्यावर, गांधी नावाच्या महात्माचा झाकोळ कायमस्वरूपी चिकटला आहे आणि आता पुन्हा एकदा ही दोन नावं एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. ही दोन्ही एकमेकांपासून वेगळी व्हावीत हे कदाचित नियतीलाही मंजूर नसावे.

गांधी जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण होण्याच्या शुभ मुहूर्तावर सावरकरांवर निर्माण होत असलेल्या ‘सावरकर हाजिर हो!’ या हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ही केवळ चित्रपट रसिकांसाठीच नाही, तर गांधी आणि सावरकर यांच्या सर्व अभ्यासकांसाठी, अनुयायींसाठीही महत्त्वाची बाब ठरणार आहे. लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी या चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करून या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती आई श्री भगवतीदेवी प्राॅडक्शन्सची असून निर्माता ज्ञानेश्वर मर्गज आहेत. ज्ञानेश्वर मर्गज या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये पर्दापण करीत आहेत.

या महिन्याच्या अखेरीस ‘सावरकर हाजिर हो!’च्या चित्रीकरणास सुरूवात होणार असून प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ३० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तारखेचं वैशिष्टय म्हणजे याच दिवशी १९४८ ला गांधीजीची हत्या करण्यात आली होती. ‘सावरकर हाजिर हो!’ हा चित्रपट गांधी जयंती दिवशी घोषित करून भारतभरात या चित्रपटाचे प्रदर्शन गांधी पुण्यतिथी दिवशी होणार आहे. चित्रपटाचा विषय नेमका काय असेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे. त्याचवेळी या चित्रपटाची स्टारकास्टही गुलदस्त्यात आहे.हेही वाचा -

लग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा