Advertisement

लग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज

कल्कि हिनं एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, होणाऱ्या बाळाला मला पाण्यात जन्म द्यायचा असून त्याबद्दल मी फार उत्सुक आहे.

लग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज
SHARES
Advertisement

बॉलिवूडमधील अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच आई होणार आहे. कल्की पाच महिन्यांची गर्भवती असून तिने होणाऱ्या नवजात बालकाबद्दल एक नवा खुलासा केला आहे. कल्की हिनं एका मुलाखतीत असं म्हटले आहे की, होणाऱ्या बाळाला मला पाण्यात जन्म द्यायचा असून त्याबद्दल मी फार उत्सुक आहे. तसंच गेल्या काही महिन्यांपासूम माझ्या दैनंदिन जीवनात फार बदल झाला आहे.

कल्कि होणार आई

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, कल्कीला गर्भवती असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर तिनं मोकळेपणानं उत्तर देत म्हणाली, आई होण्याचा आनंद होत असून येणाऱ्या नवजात बाळामुळे एक नवा उत्साह आला आहे. फक्त एवढंच नाही तर नवजात बाळाचं नाव काय असणार याचा विचार सुद्धा कल्कीनं केला आहे.


'हा' आहे  बॉयफ्रेंड

कल्कीच्या ब्रॉयफ्रेंडचं नाव गय हर्षबर्ग असून तो पेशानं क्लासिकल पियॉनिस्ट आहे. हर्शबर्ग सध्या मुंबईत राहत आहे. सुत्रांच्या मते हर्शबर्ग जनावरांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओशी जोडला गेला आहे. गेल्या महिन्यातच कल्कीनं हर्शबर्ग याच्यासोबत एक फोटो शेअर केला होता.


अनुराग-कल्की फक्त फ्रेंड

यापूर्वी कल्कीनं २०११  मध्ये चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केलं. त्यानंतर विवाहबंधनात अडकले होते. मात्र अनुराग आणि कल्की या दोघांचं लग्न बराच काळ टिकू न शकल्यानं ते विभक्त झाले. आता कल्की आणि अनुराग एकमेकांचे चांगले मित्र आहेत.हेही वाचा

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका

'या' दिवशी 'तारक मेहता...’ मालिकेत होणार दयाबेनची वापसी


संबंधित विषय
Advertisement