Advertisement

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका

मर्दानी २ चित्रपटाचा टिझर ट्वीटरवर प्रदर्शित जाला आहे. 'मर्दानी' चित्रपटाचा हा चित्रपट रिमेक असून यात राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका पाहायला मिळणार आहे.

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका
SHARES

लग्नानंतर राणी मुखर्जीनं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे. राणी मुखर्जी 'मर्दानी २' हा चित्रपट घेऊन १३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मर्दानी' चित्रपटाचा हा रिमेक असून यात राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका पाहायला मिळणार आहे. 'मर्दानी'चा पहिला भाग देशात लहान मुलांच्या केल्या जाणाऱ्या तस्करीवर आधारित होता.

'मर्दानी २' हा एक नायिका प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील राणीचा डायलॉग दमदार आहे. अब तू किसी लड़की को हाथ लगाकर तो दिखातुझे इतना मारूगी कि तेरी त्वचा से तेरी उम्र का पता भी नहीं चलेगा।’ हा डायलॉग सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. तसंच या टीझरमध्ये राणी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. 'मर्दानी २' मध्ये राणी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका माहिला पोलिस अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे. गोपी पुथरण यांनी 'मर्दानी २चे दिग्दर्शन केलं आहे.


हेही वाचा

या सिनेमात अनुभवा अंकुश-शिवानीची केमिस्ट्री

सई ताम्हणकर पुन्हा दिसणार धाडसी भूमिकेत


संबंधित विषय
Advertisement