या सिनेमात अनुभवा अंकुश-शिवानीची केमिस्ट्री

एखादी नवी जोडी येणार असली की सर्वांनाच त्यांच्या केमिस्ट्रीची उत्सुकता लागते. आता सर्वांना अंकुश चौधरी आणि शिवानी सुर्वे यांची केमिस्ट्री पाहण्याचे वेध लागले आहेत.

SHARE

एखादी नवी जोडी येणार असली की सर्वांनाच त्यांच्या केमिस्ट्रीची उत्सुकता लागते. आता सर्वांना अंकुश चौधरी आणि शिवानी सुर्वे यांची केमिस्ट्री पाहण्याचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी आणि बिग बॉस २ फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्यातील केमिस्ट्री दाखवणारं ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटातील ‘नाते हे कोणते…’ हे गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालं आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केलं आहे. अविनाश विश्वजित या संगीतकार जोडगोळीनं संगीतबद्ध केलेलं ‘नाते हे कोणते…’ हे गाणं हरगुन कौर आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. गाण्याच्या बोलांप्रमाणंच ‘नाते हे कोणते, कोणास ना, कळले कधी…’ अशी या दोघांच्याही मनाची अवस्था या गाण्यात दिसते. या गाण्यात अंकुश आणि शिवानी दोघेही भान विसरून एकमेकांशी फोनवर गप्पा मारताना दिसत आहेत.

‘नाते हे कोणते…’ या गाण्यात अंकुश आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत असतानाही केवळ शिवानीसोबत फोनवर बोलण्यात गुंग दिसतो, तसेच शिवानीसुद्धा आपल्या घरी, कॉलेजमध्ये असतानाही सतत फोनवर बोलताना दिसते. बऱ्याचदा अंकुशच्या या फोनवर बोलण्यामुळं त्याच्या मित्रांची धमाल उडते व शिवानीला चक्क पेपर सोडवताना तिच्या सभोवतालची सर्व लोकसुद्धा फोनवर बोलताना दिसतात. नेमकं शिवानी आणि अंकुश यांच्यातील हे नातं काय आहे? फक्त एक मिसकॉल तुमचं आयुष्य बदलू शकतो, या संदेशाचं मोठं बॅनर अंकुशला या गाण्यात दिसतं. त्या विषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

‘ट्रिपल सीट’मध्ये अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे सहनिर्माते स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माते अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट आता २४ ऐवजी २५ ऑक्टोबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

सई ताम्हणकर पुन्हा दिसणार धाडसी भूमिकेत

तेजस्वीनीची दैवी रूपं पाहिली का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या