Advertisement

सोनू सूद करणार ४५ हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था

वडील शक्ती सागर सूद यांच्या नावानं सोनू सूदनं एक अन्नछत्र सुरु केलं आहे. या मार्फत तो गरजूंना मदत करणार आहे.

सोनू सूद करणार ४५ हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था
SHARES

राज्य प्रशासनासह प्रत्येक नागरिक कोरोना (coronavirus) विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या लढ्यात नागरिकांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटीही पुढे सरसावले आहेत. COVID 19 विरोधातील लढ्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी आर्थिक मदत देखील देऊ केली आहे. तर गरजूंपर्यंत जेवण पुरवण्याचे काम काही कलाकार करत आहेत. यामध्ये आता सोनू सुद (Sonu Sood)चं देखील नाव समोर आलं आहे. दररोज जवळपास ४५ हजार गरजूंच्या (Needy People) जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय सोनू सुदनं घेतला आहे.

यासंदर्भात एका न्यूज चॅनलनं दिलेल्या वृत्तानुसार,  वडील शक्ती सागर सूद यांच्या नावानं सोनू सूदनं एक अन्नछत्र सुरु केलं आहे. त्याच्या अन्नछत्राचे ‘शक्ती अन्नदानम योजना’, असं नाव आहे. तो या अन्नछत्रांतर्गत दररोज मुंबईतील जवळपास ४५ हजार लोकांना जेवण पुरवणार आहे.

आपल्या सगळ्यांना सध्याच्या या कठिण समयी एकत्र येणं गरजेचे आहे. दोन वेळचं जेवण आणि डोके झाकायला आपल्याकडे छप्पर असल्यामुळे आपण निश्चिंत आहोत. पण समाजात असेही काही जण आहेत, ज्यांना दोन वेळचं जेवण मिळणं देखील कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे या लोकांच्या मदतीसाठी मी माझ्या वडिलांच्या नावानं एक अन्नछत्र सुरु केलं आहे. या अन्नछत्राच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना जेवण आणि किराणा सामान पुरवणार आहोत. मला आशा आहे, या अन्नछत्राच्या माध्यमातून मी शक्य तितक्या नागरिकांची मदत करु शकेन, असे सोनू सूदनं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अभिनेता सोनू सूदनं त्याचे मुंबईतील हॉटेल खुले केले. डॉक्टर आणि अन्य कर्मचारी या हॉटेलमध्ये आराम करु शकतात, असं त्यानं सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.  

आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली. तर अनेकांनी कामगारांच्या जेवणाचा आणि त्यांना धान्य वाटप करम्याची जबाबदारी उचलली आहे. अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खाननं गरजूंना अन्नधान्य वाटप अशाप्रकारे मदतीचा हात दिला आहे. अक्षय कुमारनं देखील नुकतेच पालिकेला ३ कोटी रुपये दिले. आता या कलाकारांमध्ये सोनू सूदच्या नावाची देखील भर पडली आहे.



हेही वाचा

अक्षय कुमारची 'दर्यादिली', पंतप्रधानांनंतर पालिकेलाही आर्थिक मदत

१६ हजार मजुरांच्या पाठिशी भाईजान, 'अशी' केली आर्थिक मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा