Advertisement

आलिया भट्टच्या मंगळसूत्र ते मेहंदीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये दडलंय खास चिन्ह, काय आहे त्याचा अर्थ?

लग्नामधील आलियाचा लुक (Alia Bhatt wedding look) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यापेक्षाही जास्त चर्चा तिच्या दागिन्यांची आणि त्यामध्ये दडलेल्या खास संदेशाची होत आहे.

आलिया भट्टच्या मंगळसूत्र ते मेहंदीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये दडलंय खास चिन्ह, काय आहे त्याचा अर्थ?
SHARES

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा विवाह सोहळा (Ranbir-Alia wedding) गुरुवारी (१४ एप्रिल २०२२) झाला. या दोघांच्या लग्नाचे फोटो (Ranbir Alia wedding pictures) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नामधील आलियाचा लुक (Alia Bhatt wedding look) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यापेक्षाही जास्त चर्चा तिच्या दागिन्यांची आणि त्यामध्ये दडलेल्या खास संदेशाची होत आहे.

आलियाचं मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्यांचा चुडा आणि मेंदीमध्येही इंग्रजीतील ८ अंकाप्रमाणे असलेले चिन्ह (Infinity symbol in Alia’s jewellery) दिसून आलं आहे.

इंग्रजीतील 8 अंक हा इन्फिनिटी (Infinity symbol) चिन्हाशी मिळताजुळता आहे. एखाद्या जोडप्यासाठी हे चिन्ह अधिक महत्वाचं आहे. कारण हे चिन्ह त्या दोघांच्या कायम सोबत राहण्याच्या निर्धाराचं प्रतीक ठरतं. आलियाच्या जवळपास सर्व दागिन्यांमध्ये आणि मेंदीमध्येही (Alia Bhatt Mehendi) हे चिन्ह दिसून आलं आहे.

आलियाच्या मंगळसूत्रात (Alia Bhatt Mangalsutra) काळे मणी आणि सोन्याच्या चेनपासून हे चिन्ह साकार झालं होतं. तर तिच्या गळ्यात एक टिअरड्रॉप डायमंड पेंडंटही (Alia Bhatt Jewellery) आहे. या पेंडंटच्या वरच्या भागात इन्फिनिटी चिन्ह आहे.

यासोबतच आलियाच्या बांगड्यांच्या चुड्यामध्येही इन्फिनिटी चिन्ह स्पष्टपणे (Alia Bhatt Kaleere) दिसून येतंय. शिवाय तिचा चुडा हा पारंपरिक पद्धतीचा नसून, कस्टमाईज्ड (Customised Kaleere) होता. तिने त्यामध्ये फुलपाखरू, ढग, चंद्र आणि ताऱ्यांचं डिझाईन तयार करून घेतलं होतं.

केवळ आलियाच्या ज्वेलरीमध्येच नाही, तर तिच्या मेंदीमध्येही रणबीरला दिलेल्या इन्फिनिटी प्रॉमिसचं प्रतीक दिसून आलं. आलियाच्या हातावरील मेंदीच्या (Alia Bhatt Mehendi) एका क्लोजअप शॉटमध्ये हे स्पष्टपणे दिसून आलं. तिच्या उजव्या हाताच्या तळव्यावर हे चिन्ह काढण्यात आलं होतं.

इन्फिनिटी सिम्बॉल असलेल्या दागिन्यांव्यतिरिक्त आलियाची अंगठीही (Alia Bhatt wedding ring) सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. एका फोटोमध्ये आलिया आणि रणबीर वेडिंग केक कापताना दिसत आहेत. या फोटोत तिची डायमंड सॉलिटेअर अंगठी दिसत आहे.हेही वाचा

महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बायोपिक, चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा