Advertisement

महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बायोपिक, चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज

भारतीय इतिहासातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बायोपिक, चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज
SHARES

भारतीय इतिहासातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'फुले' असे या चित्रपटाचं नाव असून यात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंची तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंची भूमिका साकारत आहे.

ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान, दलित, वंचित आणि महिलांसाठी केलेले कार्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन करणार आहेत. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

भारताचे पहिले महत्मा आणि सामाजिक क्रांती घडवणारे भारतातील पहिले जोडपे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजकार्याला सिनमॅटिक व्हिजन देणे हा माझा सन्मान आहे, असे ट्विट अनंत महादेवन यांनी केले आहे.

चित्रपटाचे पोस्टर प्रतीक गांधीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. महात्मा फुलेंवर आधारित हा हिंदी बायोपिक २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक होते. त्यांचा जन्म पुण्यात झाला. समाजात वर्णद्वेष, अस्पृश्यतेविरोधात त्यांनी मोठा लढा दिला. आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

१८४८ मध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यावेळी त्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावं लागलं होतं. उल्लेखनीय म्हणजे १९५४ मध्ये 'महात्मा फुले' नावाचा चित्रपट बनला होता.



हेही वाचा

R R R : रामायण, राष्ट्रप्रेम, राजामौली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा