Advertisement

Sushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत?

सुशांतच्या आत्महत्येपासून सुरू झालेला तपास कुठपर्यंत पोहोचला आहे? यात कुठली नवी माहिती समोर आली? आणि किती जणांची नावं जोडली गेली? यात ५ वेगवेगळ्या यंत्रणा कशा सहभागी झाल्या हेच आपण जाणून घेणार आहोत.

SHARES

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh Rajput) निधनाला १४ जून २०२१ रोजी एक वर्ष झालंय. सुशांतनं वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये एक वर्षापूर्वी (death anniversary) आत्महत्या केली होती.

टीव्ही मालिकेत अभिनयाचा (Acting) ठसा उमटवल्यानंतर सिनेजगतामध्येही चांगलं नाव कमावणाऱ्या सुशांतनं १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण तर समोर आलं नाही. पण यावरून बॉलिवूडमधील घराणेशाही, रीया चक्रवर्तीसोबत ब्रेकअप अशी कारणं चर्चेत राहिली.

असं असलं तरी एक वर्षानंतरही त्याच्या आत्महत्येचं कोडं कुठलीही यंत्रणा सोडवू शकली नाही. जवळपास ५ यंत्रणेनं या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. यात मुंबई पोलिस (Mumbai Police), बिहार पोलिस (Bihar Police), सीबीआय (CBI), नार्कोटिक्स ब्युरो (NCB) आणि ED या यंत्रणांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी केली.

सुशांतच्या आत्महत्येपासून सुरू झालेला तपास कुठपर्यंत पोहोचला आहे? यात कुठली नवी माहिती समोर आली? आणि किती जणांची नावं जोडली गेली? यात ५ वेगवेगळ्या यंत्रणा कशा सहभागी झाल्या हेच आपण जाणून घेणार आहोत.


मुंबई पोलिसांच तपास

  • सुशांतचा मृत्यू हायप्रोफाईल होता. पण, सुसाईड नोट मिळाली नव्हती.
  • पोस्टमार्टम अहवालानुसार सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यामुळे गुदमरुन झाल्याची माहिती समोर आली.
  • फॉरेन्सिक लॅबनं, २७ जुलै २०२० ला 'ही हत्या नाही असं स्पष्ट केलं.
  • सुशांतच्या व्हिसेरा नमुन्यात ड्रग्ज किंवा हानीकारक केमिकल्स नाहीत असंही अहवालात नमूद होतं.
  • पण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.


तपासात बिहार पोलिसांची एन्ट्री

  • मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसात रियाविरोधात तक्रार दाखल केली होता.
  • बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली.
  • पण बिहार पोलिसांना मुंबईत येऊन चौकशीचा अधिकार काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
  • सुशांत चौकशीवरून 'बिहार विरुद्ध महाराष्ट्र' असं चित्र निर्माण झालं.
  • पण बिहार पोलिस देखील याप्रकरणाचा नेमका छडा लावू शकले नाहीत.


रियाची ED कडून चौकशी

  • सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रूपयांचा फेरफार केल्याचा आरोप केला होता.
  • ED नं याप्रकरणाची चौकशी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरींग कायद्यांतर्गत (PMLA) केली.
  • ७ ऑगस्ट २०२० ला रियाची चौकशी करण्यात आली.
  • रियाची मॅनेजर, सुशांतचा माजी हाऊस मॅनेजर यांचीदेखील चौकशी केली गेली.
  • तपासात सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या किंवा तिच्या कुटुंबियांच्या आकाऊंटमध्ये कुठल्याही प्रकारचा पैशांचा व्यवहार झाला नाही, असं उघड झालं.
  • याशिवाय रिया सुशांतच्या पैशांची हेराफेरी करत असल्याचा पुरावा नसल्याची माहितीही समोर आली होती.


CBI करतेय तपास

  • जवळपास १० महिन्यांपूर्वी सीबाआयनं या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली
  • आतापर्यंत सीबीआयनं रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब, सुशांतचा मित्र सिद्धार्थ, आचारी निरज आणि दिपेश सावंत यांचे जबाब नोंदवले
  • ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) फॉरेंन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सप्टेंबर २०२० मध्ये रिपोर्ट सीबीआयला सोपवला होता.
  • रिपोर्टमध्ये नमूद होतं की, हे आत्महत्येचं प्रकरण आहे. त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत
  • अद्याप सीबीआयकडून या प्रकरणात कुठलाही खुलासा करण्यात आला नसून तपास सुरू आहे.


आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

  • रियाच्या मोबाईच चॅटमध्ये ड्रग्सच्या संभाषणाची माहिती मिळाली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली.
  • आत्महत्या प्रकरण आता ड्रग्स अँगलनं तापसले जाऊ लागले
  • ८ सप्टेंबर २०२० ला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोनं रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणी अटक केली.
  • रिया ड्रग्ज विकत घेत होती. सुशांतच्या ड्रग्ज सेवनाची सवय तिने लपवली. व्हॉट्सअप चॅटवरून ती ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित होती, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं प्रतिज्ञापत्रात कोर्टाला सांगितलं होतं.
  • २६ मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक केली.
  • याशिवाय रियानं सारा अली खानचं नाव घेतल्याची देखील चर्चा आहे. यासंदर्भात कुठलाही अधिकृत खुलासा नाही.
  • आतापर्यंत सुशांत मृत्यूनंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अर्जुन रामपाल यांची चौकशी केलीये.


५ यंत्रणांनी तपास करून देखील सुशांतच्या आत्महत्येचं कारण जैसे थे वैसेच आहे. यावरून त्याच्या चाहत्यांमध्ये अद्याप नाराजी आहे. चाहत्यांनुसार नेपोटिझममुळे त्यानं हे पाऊल उचललं, तर कुणी म्हणतं त्याची हत्या झाली. पण यामागील खरं कारण सीबीआय सांगले. कारण सध्या तेच याप्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्यांच्याच निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.



हेही वाचा

Sushant Singh Rajput Death Anniversary : बॅग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा