Advertisement

Sushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास

सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालंय, जाणून घेऊयात, सुशांतच्या करिअरमधील चढउतार

Sushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास
SHARES

१४ जुलै २०२० रोजी मुंबईतील वांद्रास्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतनं गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या सुशांतनं आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. तिथे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालंय, जाणून घेऊयात, सुशांतच्या करिअरमधील चढउतार

चार बहिणींमध्ये एकुलता एक

२१ जानेवारी १९८६ रोजी जन्मलेला सुशांतसिंह राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. शिक्षणात खूप हुशार होता. ११ वीत फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये गेला होता. तिथं त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. तो आपल्या आईच्या खूप जवळचा होता. मात्र २००२ मध्ये त्याच्या आईच्या निधनानंतर त्याचं पूर्ण कुटुंब पाटण्यावरून दिल्लीला शिफ्ट झालं होतं. नंतर त्याचं कुटुंब पुन्हा पाटण्याला परतलं.

श्यामक दावरकडून घेतले नृत्याचे धडे

दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतानाच सुशांतनं श्यामक डावरचा डान्स ग्रुप जॉइन केला होता. श्यामकसोबत सुशांतनं देश-विदेशात अनेक शोज केले. याबरोबरच अनेक चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर्सचंही काम केलं.

२००६ मध्ये सुशांतनं ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये परफॉर्म केले होते. त्यानं ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून डान्स केला होता. डान्सबरोबरच तो अभिनयाचे धडेही घेत होता.

अशी मिळाली अभिनयाची पहिली संधी

डान्सनंतर सुशांत बॅरी जॉनच्या अभिनय वर्कशॉपमध्ये सहभागी झाला होता. पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असताना बालाजी टेलिफिल्म्सच्या कास्टिंग टीमची नजर सुशांतवर पडली. आणि त्याला २००८ मध्ये 'किस देश में है मेरा दिल' हा शो मिळाला. या मालिकेत हर्षद चोप्रा आणि अदिती गुप्ता मेन लीडमध्ये होते. तर सुशांतनं प्रीत सिंह जुनेजा हे सेकंड लीड साकारले होते.

पवित्र रिश्तामध्ये काम

'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतील सुशांतच्या अभिनयानं एकता कपूर बरीच इम्प्रेस झाली होती. सुशांतची स्माइल बघून एकतानं त्याला 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका दिली होती. या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला होता.

'काय पो छे' या चित्रपटात भूमिका

सुशांतनं अभिषेक कपूरच्या 'काय पो छे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. २०११ मध्ये कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांची नजर सुशांतवर पडली होती. त्यांनीच त्याला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. ऑडिशन दिल्यानंतर सुशांतला या चित्रपटात भूमिका मिळाली होती. 'काय पो छे'च्या चित्रीकरणादरम्यान सुशांतने राजकुमार हिरानींचा 'पीके' हा चित्रपट साइन केला होता. हा त्याचा तिसरा चित्रपट ठरला होता.

यशराजसोबत करार

हिट चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर सुशांतनं यशराज बॅनरसोबत ३ चित्रपटांचा करार केला होता. या कराराअंतर्गत तो 'शुद्ध देसी रोमान्स' (२०१३) आणि 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' (२०१५) मध्ये झळकला होता. त्यानंतर सुशांत यशराज बॅनरच्या शेखर कपूर दिग्दर्शित ‘पानी’ या चित्रपटात झळकणार होता. मात्र प्रॉडक्शनने बॅक आउट केल्यानं हा चित्रपट रखडला.

अभिनय कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

२०१८ मध्ये रिलीज झालेला 'छिछोरे' हा चित्रपट सुशांतच्या अभिनय कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. 'पीके' आणि 'एमएस धोनी'नंतर बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कलेक्शन करणारा सुशांतचा हा तिसरा चित्रपट होता.

‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं नाव

पहिले रिलेशनशिप मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये त्याची सहकलाकार अंकिता लोखंडेसोबत राहिले. सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचं कारण समोर येऊ दिले नाही. यानंतर त्याचे नाव अभिनेत्री कृती सेननसोबतही जोडलं गेलं. तो तेव्हा तिच्यासोबत 'राब्ता' चित्रपट करत होता. निधनाआधी सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते.

‘या’ चित्रपटांना दिला नकार

'हाफ गर्लफ्रेंड' (2017) मध्ये कास्ट करण्यात आलं होतं. पण सुशांतनं 'राब्ता' (२०१७) साठी हा चित्रपट नाकारला होता. त्याचप्रमाणे ‘फितूर’ (2015) हा चित्रपट आदित्य रॉय कपूरच्या आधी सुशांतला ऑफर झाला होता. याशिवाय सुशांतनं 'सडक २' (2020) आणि 'रोमियो अकबर वॉल्टर' (2019) हे चित्रपटही नाकारले होते.

'दिल बेचारा' शेवटचा चित्रपट

सुशांत सिंह राजपूत 'दिल बेचारा' या चित्रपटात अखेरचा झळकला. हा चित्रपट त्याच्या निधनानंतर एक महिन्यानी म्हणजे २४ जुलै २०२० रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार वर रिलीज झाला होता. चित्रपटाच्या रिलीजच्या काही तासांतच चाहत्यांनी त्याला ९.९ रेटिंग दिले आणि हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वोच्च रेटिंग असलेला चित्रपट ठरला.हेही वाचा

दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा