‘स्ट्रीट डान्सर’साठी वरुण-प्रभूचं रियुनियन

डान्सवर आधारित असलेल्या ‘एबीसीडी २’ या सिनेमानंतर अभिनेता वरुण धवन आणि डान्स मास्टर प्रभू देवा यांचं पुन्हा एकदा रियुनियन झालं आहे.

SHARE

डान्सवर आधारित असलेल्या ‘एबीसीडी २’ या सिनेमानंतर अभिनेता वरुण धवन आणि डान्स मास्टर प्रभू देवा यांचं पुन्हा एकदा रियुनियन झालं आहे. ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या आगामी सिनेमात वरुण आणि प्रभू पुन्हा एकत्र दिसणार आहेत.


प्रेक्षकांसाठी पर्वणी

भूषण कुमार आणि रेमो डिसूझा एकत्र येऊन डान्सवर आधारित सिनेमा बनवत आहेत. ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात वरुण धवन मुख्य भूमिकेत असून, सोबत प्रभू देवाही आहे. त्यामुळे या सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेल्या डान्स स्टेप्स आणि डान्सिंग फार्म्स पाहायला मिळणार आहेत. डान्सला आपलं पॅशन मानणारे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र येणं ही नृत्यप्रेमींसोबतच सिनेप्रेमींसाठीही पर्वणी ठरणार आहे.


श्रद्धा डान्सिंग शिकण्यात व्यग्र

रेमोच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमाचं पहिलं शूटिंग शेड्युल अमृतसरमध्ये पार पडलं आहे. यामध्ये वरुणसोबत पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवावर काही सीन्स चित्रीत करण्यात आले. या सिनेमाचं पुढील शूटिंग शेड्युल ११ फेब्रुवारीपासून लंडन येथे सुरू होणार आहे. मार्च अखेरपर्यंत चालणाऱ्या या शेड्युलमध्ये इतर कलाकारांसोबत प्रभू देवाही सहभागी होणार आहे. इतकंच नव्हे तर वरुण-प्रभू यांच्या जोडीला श्रद्धा कपूरही या सिनेमात आहे. तीसुद्धा लंडनमध्ये पोहोचून चित्रीकरणाच्या टिममध्ये सहभागी होणार आहे. सध्या ती याच सिनेमासाठी विविध प्रकारचे डान्सिंग फार्म्स शिकण्यात व्यग्र असल्याचं समजतं.


स्पेक्टॅक्युलर डान्सिंग परफार्मंसेस

रेमोच्या म्हणण्यानुसार, ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ हा सिनेमा आपल्यासाठी फॅमिली रियुनियन आहे. यापुढेही आपल्याला प्रभू देवा यांच्यासोबत काम करायचं असल्याचंही तो म्हणाला. वरुण, प्रभू, श्रद्धा यांच्या जोडीला नूरा फतेही हे परिपूर्ण मनोरंजक पॅकेज ‘स्ट्रीट डान्सर ३डी’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं निर्माते भूषण कुमार यांचं मत आहे. ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या सिनेमात स्पेक्टॅक्युलर डान्सिंग परफार्मंसेस पाहायला मिळणार असल्याने उत्सुकता वाढल्याचं निर्मात्या लिझली डिसूझा यांचं म्हणणं आहे. ८ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.


हेही वाचा -

आयफोनवर शूट होणार सई-वैभवचा ‘पाँडीचेरी’

'व्हेअर इज माय कन्नडका' म्हणत दक्षिणेकडे वळली पत्रलेखासंबंधित विषय
ताज्या बातम्या