Advertisement

'व्हेअर इज माय कन्नडका' म्हणत दक्षिणेकडे वळली पत्रलेखा

२१०४ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक हंसल मेहतांच्या 'सिटीलाईट्स' या सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा दिला. या चेहऱ्याने बहारदार अभिनय कौशल्याद्वारे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा चेहरा म्हणजेच अभिनेत्री पत्रलेखा पाॅल... हिंदीमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर पत्रलेखा आता दक्षिणेकडे वळली आहे.

'व्हेअर इज माय कन्नडका' म्हणत दक्षिणेकडे वळली पत्रलेखा
SHARES

२१०४ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक हंसल मेहतांच्या 'सिटीलाईट्स' या सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा दिला. या चेहऱ्याने बहारदार अभिनय कौशल्याद्वारे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा चेहरा म्हणजेच अभिनेत्री पत्रलेखा पाॅल... हिंदीमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर पत्रलेखा आता दक्षिणेकडे वळली आहे.

लंडनमध्ये चित्रण

हिंदीत आपला ठसा उमटवल्यानंतर पत्रलेखा कानडी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'व्हेअर इज माय कन्नडका' या अॅक्शन-कॉमेडी सिनेमात पत्रलेखा दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता गणेशसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला एप्रिल महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटातील बरेचसे सीन्स लंडनमध्ये चित्रीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

वर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित

कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्री-प्रॅाडक्शन या सर्व गोष्टींची जुळवाजुळव पूर्ण झाली असून, एप्रिल आणि मे महिन्यात युनायटेड किंगडममध्ये या सिनेमाचं संपूर्ण शूट पूर्ण करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. शूटिंग पूर्ण झाल्यावर पोस्ट-प्रॅाडक्शनचं काम वेगात पूर्ण करून या वर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. कन्नड आणि हिंदीमध्ये बऱ्याच टेलिव्हिजन शोजचं दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही रीअल लाईफ पती-पत्नीची जोडी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

भूमिका खास

आपल्या पहिल्याच कन्नड सिनेमाबाबत पत्रलेखा खूप उत्सुक आहे. ती म्हणते की, हा माझा पहिला कानडी सिनेमा असल्याने उत्सुकता खूप वाढली आहे. इतक्यात सिनेमातील भूमिकेबद्दल फारसं काही बोलू शकत नसले तरी मी आजवर ऑनस्क्रीन असं काही काम केलं नाही, एवढं मात्र नक्की सांगेन. त्यामुळे अर्थातच ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे.

हेही वाचा -

दादा कोंडकेंची आॅनस्क्रीन आई बनली वैभवची आजी!

अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावं - राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा