Advertisement

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची 'अफवाच'


ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची 'अफवाच'
SHARES

पडद्यावर दमदार अभिनय सादर करणारे आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ८१ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करत आहेत. मात्र कादर खान यांच्या निधनाची बातमी खोटी असून ती निव्वळ अफवा असल्याचं त्यांचा मुलगा सरफराज खान यांनी सांगितलं आहे.


कॅनडात उपचार

''प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजाराने त्रस्त असलेल्या कादर खान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तसंच, रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेत आहेत'', असं सरफराज यांनी स्पष्ट केलं.


चुकीचं ट्विट

काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू, ऑल इंडिया रेडिओनं त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून त्यांच निधन झाल्याचं ट्वीट केलं. त्यामुळं रविवारी रात्रीपासूनचं सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.


हरहुन्नरी कलाकार

कादर खान यांनी ‘डाग’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘कुली’, ‘होशियार’, ‘हत्या’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे त्यांनी लेखन केलं आहे.

मेगास्टार अमिताभ बच्चन, यांच्यासोबत त्यांनी "मुकद्दर का सिकंदर", "मिस्टर नटवरलाल", "सुहाग", "कुली आणि" शहंशाह " सारख्या सिनेमान काम केलं आहे. अमिताभ यांनी शुक्रवार ट्विटरवरुन त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती.

कादर खान यांना अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणं, त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. अभिनेता आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांनी चांगलेच नाव कमावलं आहे.



हेही वाचा-

कादर खान यांची प्रकृती नाजूक; कॅनडात उपचार सुरू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा