Advertisement

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
SHARES

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. मात्र, आज सकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, त्यांची प्रकृती खालावली. अखेर आज दुपारी 2.30 वाजता विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.

विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. या सिनेमाचे नाव 'परवाना' असे होते.

'हम दिल दे चुके सनम' या ब्लॉकबस्टर सिनेमात विक्रम गोखलेंनी काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा